Raghunath Kuchik latest news
Raghunath Kuchik latest news 
पुणे

Raghunath Kuchik : 'भाजपच दलालीचं षडयंत्र, निवडणुका केंद्रस्थानी ठेवून सेनेला संपवण्याचा घाट घातलाय'

सकाळ डिजिटल टीम

भाजपाने मात्र ईडी, सीबीआयला हाताशी धरून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला

शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलसाठी राज्यभरात मेळावे, बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान, कोरोना काळात देशातल्या दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने असं काम केलं नसेल, असं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मात्र भाजपाने ईडी, सीबीआयला हाताशी धरून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला. भाजपने मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असा हल्लाबोल सेना नेते रघुनाथ कुचिक यांनी केला आहे.

पुण्यात झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा एक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला धारेवर धरलं. ते म्हणाले, भाजपने (BJP) अप्रत्यक्षरित्या अनेक लोकांना त्रास दिला. ईडी, सीबीआय पासून कुठलाही नेता सुटलेला नाही. एवढेच काय तर वैयक्तिक चारित्र्य हननापासूनही नेते सुटले नाहीत. त्याचा बळी मी आहे. मी हे सगळं भोगलंय. तुमच्याकडे इनकम नसेल तर तुमचं चारित्र्य पाहिलं जातं, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

पुढे कुचिक म्हणाले, कोरोना काळात देशातल्या दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने असं काम केलं नसेल, असं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. त्याचीच सल केंद्रांतील मंत्र्याना होता. म्हणून त्यांच्याविरोधात ही कारस्थाने केली गेली. आतापर्यंत अनेकदा बंडखोरी झाली आहे. पण ही बंडखोरी टिकणार नाही. त्यामुळे आता सच्चा शिवसैनिकाने तितक्याचे त्वेषाने कामाला लागलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

ते म्हणाले, भाजपचे हे दलालीचे षडयंत्र आहे, उद्धव ठाकरे यांच्यावरील केंद्रांचा रोष आणि येणाऱ्या महापालिका निवडणूका केंद्रस्थानी ठेवून हे शिवसेना संपवण्याचा घाट घालण्यात आला आहे. आताच जर शिवसेनेला थोपवलं तर पुढचे पंचवीस वर्ष शिवसेना आजूबाजूलाही दिसणार नाही, हा भाजपचा डाव आहे. मुंबई हा शिवसेना प्राण आहे, महाराष्ट्राचा प्राण आहे, त्यामुळे मुंबई सांभाळायची जबाबदारी तुमची आणि माझी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT