Rahi Popere speats at Sangavi Pune  
पुणे

हायब्रिड धान्यात चमक आहे पण धमक नाही : बिजमाता राहिबाई 

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी (पुणे) : हायब्रिड, संकरित भाजीपाला,अन्नधान्य खाण्यामुळे आरोग्य सांभाळण कठिण जात आहे. हायब्रिड संकरित बियाणात चमक आहे पण धमक नाही. म्हणून पारंपारिक बियाणांची नैसर्गिकता जपली पाहिजे ते आरोग्यासाठी लाभदायक ठरणार आहे असे सांगवी येथे बिजमाता राहिबाई पोपेरे यांनी पवनाथडी जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

सांगवी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेचा शुभारंभ बुधवार (ता. ४) मार्चपासून सायंकाळी राहिबाई पापेरे,अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सुरू करण्यात आला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या बोलताना पुढे म्हणाल्या,मी अशिक्षित बाई पण मी बघतेय सगळी कागदं घेवून लिवलेल बोलतायत ते ज्यास्तीच शिकलेपणाच असतय काय? असा टोमणाही ईतर लोकप्रतिनिधींना कागदावर लिहून आणलेले भाषण करताना राहिबाई पोपेरे यांनी मारल्याने उपस्थितामधून हशा आणी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या मार्मिक वास्तववादी बोलण्याला दाद दिली.

सायंकाळी ५ वाजताची कार्यक्रमाची वेळ असूनही महापौरांना प्रमुख पाहुणे वेळेत न आल्याने कार्यक्रमास दोन तास वाट पहावी लागली. उद्घाटनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महापालिका व्यवस्थापनाकडून व्यवस्था, कार्पेट, कचरा इत्यादींची किरकोळ कामे सुरूच होती. सावित्रीबाई फुले विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी साकारलेला रोबो स्वागतासाठी ठेवण्यात आला होता. मात्र, त्यास ऑपरेटींग करतानाची उडालेली धांदल, त्याचे सेटअप नीट न झाल्याने "हा रोबो काय मेड ईन चायना नाही ना.. असा सूर नागरीकांमधून ऐकायला येत होता. अभिनेत्री रात्रीस खेळ चाले फेम शेवंता या पात्राने मराठी रसिकांना भुरळ घालणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिचे शिट्ट्या व टाळ्यांच्या गजरात रसिकांनी स्वागत केले.

आधीच उशीरा सुरू झालेल्या कार्यक्रमात बोलण्यासाठी क्रमवार पूर्वनियोजन नसल्याने मधेमधे निवेदकास यानंतर कोण बोलणार असे विचारावे लागत होते.यामुळे मधेच काहिसे व्यासपिठावरील नियोजन विस्कळित होत होते. सिनेअभिनेत्री ऐवेजी बिजमाता राहिबाई पाेपेरे यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मला कुटे यांनी केले. यावेळी बोलताना महापौर उषा ढोरे म्हणाल्या,पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पवनाथडी यात्रेला बारावे वर्ष असून गतवर्षीपेक्षा आधिक म्हणजे बाराशे पन्नास महिला बचतगटांचे स्टॉल आहेत.महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे मोठे व्यासपिठ आहे.माझ्या पिंपरी चिंचवडकर  महिला भगिनी सुगरण व कलाकुसर जोपासणाऱ्या आहेत.

कार्यक्रमास प्रतिभा महिला प्रतिष्ठाणच्या अश्विनी जगताप, रेखाताई चोरगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी अध्यक्ष विलास मडिगेरी, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, धनंजय ढोरे, जवाहर ढोरे, मनोहर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT