पुणे

कौतुकास्पद : 'सिंहगड'च्या दोन विद्यार्थ्यांची जपानच्या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड

सकाळ वृत्तसेवा

वारजे माळवाडी (पुणे) : सिंहगड इन्स्टिट्यूटच्या दोन विद्यार्थ्यांना तीन दिवसांपूर्वी थेट जपानच्या 'जीएआयटी' या कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळाली आहे. या माध्यमातून 'सिंहगड'ने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवत लॉकडाउनच्या कार्यकाळात प्लेसमेंटमध्ये 'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू केली आहे.

देशातील आघाडीच्या शिक्षण संस्था असलेल्या सिंहगड शिक्षण संस्था आहे. या कंपनीने देशातून चार जणांची निवड केली. त्यापैकी सिंहगडचे दोन विद्यार्थी आहेत. संस्थेच्या वारजे माळवाडी येथील आरएमडी सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकणारा राहूल राजे आणि सिंहगड ऍकॅडमीमध्ये शिकणारा आदित्य दाते या दोघांना 'जपान थर्ड पार्टी कंपनी लिमिटेड' या बहुराष्ट्रीय कंपनीच्या टोकियो कार्यालयात प्लेसमेंट मिळाली आहे. या दोघांनाही वार्षिक 24 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. या यशामुळे सिंहगडच्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वैश्विक मूल्यमापन करणारी 'जीएआयटी' ही एक विश्वस्तरीय मान्यताप्राप्त परीक्षण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तांत्रिक कौशल्याचे आकलन करून त्या संदर्भात संशोधनाचे कार्य पुढे नेले जाते. या कंपनीसाठी प्रतिभावान इंजिनिअर्सची निवड करण्यासाठी कंपनीच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले होते. अशाच एका इंटरव्ह्यूमध्ये सिंहगडचे विद्यार्थी राहूल राजे आणि आदित्य दाते यशस्वी ठरले. विशेष म्हणजे संपूर्ण भारतातून या कंपनीने केवळ चार विद्यार्थी निवडले, त्यापैकी दोन हे सिंहगडचे विद्यार्थी आहेत. यावरून सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम शिक्षणाच्या उत्तुंगतेची प्रचिती येते. सिंहगडच्या विद्यार्थ्यांची प्रतिभा पाहूनच जपानच्या या कंपनीने या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. हा आमच्यासाठी गर्वाचा क्षण आहे, असे सिंहगडचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव सुनंदा नवले यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हटले.

या यशाबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट प्लेसमेंटचे डीन जयेश मीनासे म्हणाले, की कितीही समस्या आल्या तरी जपानचे लोक गुणवत्तेच्या बाबतीत कधीच तडजोड स्वीकारीत नाही. उत्पादकतेमध्ये वाढ व्हावी आणि क्वालिटी वाढावी, यासाठी जपानी लोक सातत्याने प्रयत्न करीत असतात. सिंहगड इन्स्टिट्यूट गेल्या 27 वर्षांपासून जागतिक स्तरावर विभिन्न कंपन्यांसोबत जुळलेला असून, आमच्या विद्यार्थ्यांना आजवर खूप चांगल्या प्लेसमेंट मिळाल्या आहेत, अशी माहिती मीनासे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT