Ghorpadi railway flyover sakal
पुणे

Ghorpadi News : घोरपडीतील रेल्वे उड्डाणपूल मार्चमध्ये होणार नागरिकांसाठी खुला

थोपटे चौकामधील रेल्वे पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलाचे उद्घाटन होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी - थोपटे चौकामधील रेल्वे पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलाचे उद्घाटन होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अंदाजे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होईल त्याआधी या पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी उरलेले कामे तातडीने करावी अशी सूचना बांधकाम करणाऱ्या कंपनीला देण्यात आल्या आहेत.

हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर घोरपडीतील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. अनेक वर्षांपासून सोलापूर व मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वेफाटकमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. साधारण एका दिवसात दोनशे पेक्षा जास्त रेल्वे या मार्गावरून जातात.

त्यामुळे घोरपडीमध्ये सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनचालक, शालेय विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होते. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथील उड्डाणपुलासाठी परवानगी दिल्यावर हे काम मार्गी लागले.

२०१९ मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली होती, तीन वर्षात काम पूर्ण करणे अपेक्षित असताना चार वर्षापेक्षा अधिक कालावधी या कामासाठी लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या पुलाचे युद्धपातळीवर काम सुरू असून त्याचे ८ किंवा १० मार्च रोजी उद्घाटन नियोजन आहे.

श्रीनिवास बोनाला, प्रकल्प विभागप्रमुख -

घोरपडी येथील रेल्वे उडाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उड्डाणपूलावर डांबरीकरण आणि पथदिव्याचे काम शिल्लक आहे. पुढच्या पंधरा दिवसात हा पूल नागरिकांसाठी खुला होईल, जिना बनवण्याचे काम सुरू असून त्यासाठी एक महिना लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत पोटनिवडणुकीची तयारी सुरू, प्रशासनाकडून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; दीड वर्षात मतदारसंख्येत वाढ

Latest Marathi News Live Update : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; यंदा १५ लाख ३२ हजार विद्यार्थी रिंगणात

Mohol Election Result: राजन पाटील अन् भाजपचा मोहोळ तालुक्यात वरचष्मा; उमेश पाटील यांचा पराभव; चरणराज चवरे, विजयराज डोंगरे विजयी!

CM फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा, नितीन नवीन यांची घेतली भेट; NCPच्या विलिनीकरणावर चर्चा?

Valentine Scam : सरकारचा इशारा ! व्हॅलेंटाईन च्या नावावर सुरुय स्कॅम, सरप्राईज गिफ्ट्स आणि ई-कार्ड्स करताहेत तुमचं खाते रिकामे, 'ही' चूक टाळा

SCROLL FOR NEXT