Hadapsar 
पुणे

पुणे : रेल्वे फाटक बंद असल्याने वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे फाटक १४ व १५ डिसेंबरला रेल्वेच्या कामानिमित्त बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून सुमारे एक किलोमिटर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. 

फाटक बंद असल्याने काळेपडळ व रामटेकडी या दोन ठिकाणी असणा-या रेल्वे फाटकावर वाहतूकीचा ताण वाढला होता. प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने महंमदवाडी, हांडेवाडी, ससाणेनगर येथे येजा करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास झाला. हडपसर व वानवडी वाहतूक विभागाचे आठ कर्मचारी वाहतूक नियंणाचे काम करत होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केले.

न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल येथे नव्याने करण्यात आलेल्या रेल्वे भुयारी मार्गातील खड्डे बूजवून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काळेपडळ व रामटेकडी येथे झालेले वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगरसेवक योगेश ससाणे, मारूती तुपे, संजय शिंदे, जिवन जाधव, योगेश ढोरे, गणेश वाडकर यांसह अनेक नागरिकांनी वाहतूक पोलिसाची भूमीका घेवून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT