Railway Station Sakal
पुणे

रेल्वे प्रवाशांची परवड; आरक्षित तिकीट असेल तर जाता येईल

कोरोनानंतर रेल्वेसेवा सुर होताच, प्रवास हा फक्त आरक्षित तिकीटाने करता येण्याचा नियम रेल्वे विभागाने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनानंतर रेल्वेसेवा सुर होताच, प्रवास हा फक्त आरक्षित तिकीटाने करता येण्याचा नियम रेल्वे विभागाने केला आहे.

पुणे - ‘वडील अचानक आजारी पडल्याने गावी पोहचणे क्रमप्राप्त होते. पैसे कमी असल्याने रेल्वेने (Railway) जाण्याचे ठरले. योगायोगाने सोमवारी हडपसर (पुणे) ते हैदराबाद रेल्वे साडे तीन वाजता होती. हडपसर येथील रेल्वे स्थानकावर जाताच तिकीट (Ticket) घर बंद असल्याचे दिसले. आरक्षित तिकीट (Reserve Ticket) असेल तर जाता येईल, असे सांगण्यात आले. निराश होत पुन्हा माघारी फिरावे लागले’, असा अनुभव येरवड्यातील राम गिरमे (नाव बदलेले आहे) यांनी कथन केला.

कोरोनानंतर रेल्वेसेवा सुर होताच, प्रवास हा फक्त आरक्षित तिकीटाने करता येण्याचा नियम रेल्वे विभागाने केला आहे. त्यामुळे जनरल (साधे) तिकिटाची विक्रीच होत नसल्याने प्रवास करता येत नाही. यामुळे अचानक काही कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. राम हा मुळचा लातूरचा असून तो कामानिमित्ताने येरवड्यात राम गेल्या पाच वर्षापासून एका हॉटेलमध्ये कामास आहे. हडपसर ते हैदराबाद ही रेल्वेसेवा सुरु झाल्यापासून नेहमीच या रेल्वे गाडीने प्रवास करतो. १३५ रुपयांमध्‍ये थेट लातूर मध्ये उतरता येते, असे तो सांगतो. मात्र आरक्षित तिकीटाने प्रवास करण्याच्या अटीमुळे त्रास सहन करावा लागल्याचे त्याने सांगितले.

राम म्हणाला की, ‘रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने एसटी बसने जाण्याचे ठरवले. मात्र एसटी बंद असल्याने नाइलाजाने खासगी बसने ७५० रुपये भाडे देऊन प्रवास करावा लागला.’

पुणे रेल्वे प्रवास

  • दिवासभरातील प्रवासी - ७० हजार

  • लोकल रेल्वे - २०

  • डेमू रेल्वे - ८

  • मध्य रेल्वेच्या गाड्या - ४४५

  • इतर विभागाच्या गाड्या - २२८

रेल्वे बोर्डाने जनरल तिकीट सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र रेल्वेच्या मध्य विभागाला अजूनही जाग येत नाही. जनरल तिकीट नाकारून विनाप्रवासाचा दंड आकारून पैसे कमविण्याचे काम मध्य रेल्वे करत आहे. जनरल तिकिटासाठी १ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

- हर्षा शहा, अध्यक्षा, प्रवासी ग्रुप

रेल्वे गाडी सुटण्याच्या चार तास आधी आरक्षित तिकिटांचा चार्ट तयार होतो. त्यात रिक्ता जागा असतील, तर गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी बुकिंग करता येते. मध्य रेल्वेने अद्याप जनरल तिकिटाची सेवा सुरू केली नाही. मुख्यालयाकडून आदेश येताच सेवा सुरू केली जाईल.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT