Crime
Crime 
पुणे

रेल्वेत चोऱ्या करणारा कॅमेऱ्यामुळे जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे - रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. पुणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचे चोरलेले नऊ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

अल्लाबक्ष महम्मद इस्माईल (वय १९, रा. टिपू चौक, पाशापुरा, गुलबर्गा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थ कांतिलाल भंडारी (रा. बेळगाव) यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती. लोहमार्ग पोलिस अधीक्षक दीपक साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी हे सात जुलै रोजी अजमेर-म्हैसूर एक्‍स्प्रेसने प्रवास करत होते. पुणे स्टेशन रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर भंडारी यांच्या पत्नीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सात लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला, तर २ सप्टेंबर रोजी रेखा ललित भंडारी (रा. इचलकरंजी) या जोधपूर बेंगलोर एक्स्प्रेस या रेल्वने प्रवास करत असताना पुन्हा पुणे स्टेशन येथेच दागिन्यांची पर्स चोरीला गेली.

या घटनांचा तपास आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. याप्रकरणी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत असताना दोन्ही गुन्हे एकाच आरोपीने केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आरोपी अल्लाबक्षचा शोध घेण्यास सुरवात केली. अल्लाबक्ष हा गुलबर्गा येथील असल्याची माहिती पथकास मिळाल्यानंतर चित्रफितीवरून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले. त्यानंतर गुलबर्गा येथून त्यास ताब्यात घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT