Memu Train sakal
पुणे

Memu Train : ‘मेमू’साठी रेल्वेच्या दोन विभागांची ‘धावाधाव’; पुणे व भुसावळ विभागांत रस्सीखेच

पुणे-दौंड दरम्यान सध्या धावत असलेली ‘मेमू’ (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ही पुणे विभागातच राहावी म्हणून पुणे विभाग प्रयत्नशील आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे-दौंड दरम्यान सध्या धावत असलेली ‘मेमू’ (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ही पुणे विभागातच राहावी म्हणून पुणे विभाग प्रयत्नशील आहे, तर मेमूचा रेक तात्पुरत्या स्वरूपात आम्ही पुण्याला दिला असून तो आम्ही कसल्याही परिस्थितीत परत घेऊ, अशी आक्रमक भूमिका भुसावळ विभागाने घेतली आहे. त्यामुळे पुणे आणि भुसावळ रेल्वे विभागात ‘मेमू’साठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

पुणे - दौंड स्थानकादरम्यान धावणारी ‘डेमू’ (डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट)‘पीओएच’साठी (देखभाल व दुरुस्ती) माटुंगा येथील वर्कशॉप येथे पाठविण्यात आला. दुरुस्ती झाल्यावर १६ जूनला ‘डेमू’चा रेक पुण्यात दाखल होईल. त्यानंतर ‘मेमू’चा रेक भुसावळला पाठविण्यात येणार आहे. त्या शर्तीवरच ‘मेमू’चा रेक पुण्याला देण्यात आल्याने तो रेक पुन्हा भुसावळला जाण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेऊनच पुणे विभाग देखील मध्य रेल्वेच्या मुख्यालयावर ‘दबाव’ निर्माण करीत आहे.

आता जनरेटा आवश्यक

दौंड वासियांना जर ‘मेमू’ची सेवा हवी असेल तर त्यांनी आता आक्रमक भूमिका घेणे आवश्यक आहे. केवळ निवेदन देऊन हा प्रश्न सुटणार नाही. विषयाचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे. रेल रोको झाल्यास याची दखल रेल्वे बोर्ड कडून घेण्यात येते. तेव्हा ‘मेमू’साठी जनरेटा आवश्यक बनला आहे.

पुणे-दौंड दरम्यान ‘मेमू’ धावावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्नदेखील सुरू आहेत. मुख्यालय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

पुणे-दौंड दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ‘डेमू’च्या तुलनेत ‘मेमू’मधून अधिक प्रवासी वाहतूक होते. तेव्हा प्रवाशाची सोय लक्षात घेता दौंड दरम्यान ‘मेमू’च धावावी, तसेच दौंडपर्यतचा सेक्शन सबरबन म्हणून जाहीर होणे गरजेचे आहे.

- निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे भाव घसरले! चांदीच्या भावातही मोठी घट; जाणून घ्या आजचे भाव

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढणार

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच

Rohit Sharma च्या मनातलं नाव जादुगारानं एकदम करेक्ट ओळखलं, हिटमॅनही झाला आवाक्; Video Viral

SCROLL FOR NEXT