Pune Rain Sakal
पुणे

पुण्यात पावसाचे ‘कम बॅक’

पुणे शहरात गुरुवारी पावसाचे दमदार ‘कम बॅक’ झाले. सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. पुढील दोन दिवस पावसाची रिमझिम सुरू राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरात (Pune City) गुरुवारी पावसाचे (Rain) दमदार ‘कम बॅक’ (Come Back) झाले. सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. पुढील दोन दिवस पावसाची रिमझिम सुरू राहणार आहे. शहराच्या परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पुणेकरांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आले. (Rain Come Back in Pune)

पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत होत्या. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होऊन प्रत्यक्ष पावसाने मात्र दडी मारली होती. हे चित्र शुक्रवारी सकाळपासून बदलले. शहरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. सकाळी सहा वाजल्यापासून पावसाच्या सरींना सुरवात झाली. विशेषतः सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड, वारजे, कात्रज भागात पावसाच्या एकामागोमाग एक मोठ्या सरी पडत होत्या.

त्यानंतर शहराच्या मध्य वस्तीतील पेठांमध्येही दुपारनंतर पावसाला सुरवात झाली. संध्याकाळपर्यंत या सरी पडत होत्या.

पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात ढग जमा झाले आहेत. हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले आहे. तसेच, वाऱ्याचा वेगही पावसाला पोषक आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामानाचा अंदाज

  • १८ जून : हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

  • १९ जून : आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची ५१ ते ७५ टक्के शक्यता

गुरुवारचा पाऊस

  • सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस : ३.९ मिलिमीटर

  • सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत नोंदलेला पाऊस : ११.५ मिलिमीटर

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढग जमा झाले आहेत. पुणे जिल्ह्यात पुढील चोवीस तासांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. येत्या शनिवारपर्यंत (ता. १९) पावसाच्या सरी पडतील. त्यानंतर शहर आणि परिसरातील पावसाचा जोर ओसरले.

- डॉ. अनुपम काश्यपी, हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान खाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT