rain sakal
पुणे

पुणे शहर आणि परिसरात हलक्या सरींची हजेरी

पुणे शहर आणि परिसरात शनिवारी दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामान कायम होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर आणि परिसरात शनिवारी दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामान कायम होते. त्यानंतर सायंकाळी पाऊस पडला. तर येत्या मंगळवारपर्यंत (ता. २३) शहरात अशीच स्थिती कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ढगाळ हवामानामुळे सध्या शहरातून थंडीने पळ काढला असून सरासरीच्या तुलनेत किमान तापमान हे ७ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदले गेले. शहरात २१.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुणेकरांना निदान पुढील चार दिवस थंडीची प्रतिक्षा करावी लागेल. शुक्रवारनंतर (ता. २६) शहर व परिसरातील आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून यानंतर किमान तापमानाचा पारा देखील घसरेल.

सध्या अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पाऊस पडला. सर्वाधिक कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्‍वर येथे १७.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली आला आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा ताप अधिक असल्याचे दिसून आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतात पुढील १५ दिवसांपर्यंत कोणत्याही पश्‍चिमी प्रकोपाची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) शक्यता नसून राज्यातही ‘शीत लहरीची’ शक्यता जाणवत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT