Pune_Rain 
पुणे

ऐन थंडीत पुणेकर पावसात न्हाहले; अचानक आलेल्या पावसाने उडाली तारांबळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बदललेल्या ऋतू चक्राचा अनुभव सध्या पुणेकर घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना गुरुवारी (ता.७) वरुणराजानंही दर्शन दिलं.

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरांत ढगाळ वातावरण दिसत होते. पाऊस येईल की नाही याची धाकधूक वाटत असतानाच गुरुवारी सायंकाळपासून शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे डेक्कन, नवी पेठ, बुधवार पेठ, कसबा पेठ या ठिकाणी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली होती. तसेच बिबवेवाडी, नगर रस्ता भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. 

दरम्यान, गुरुवारी आणि शुक्रवारी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली होती. राज्यावर द्रोणीय पट्टा निर्माण झाल्यानं पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांनी शुक्रवारी घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत घेऊन बाहेर पडावे. 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Video Rescue Kolhapur : पाण्यासाठी बिबट्यांच्या बछड्यांची वणवण, विहिरीत डोकावून पाहिलं अन्; अडीच तासांनंतर वनविभागाला आलं यश

ZP Elections 2026 Voting Live Update : परभणीच्या राणीसावरगावमध्ये मतदानावरून गदारोळ; मतदानापासून रोखल्याचा आरोप

Gajanan Maharaj Prakat Din 2026: यंदा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी? जाणून घ्या तारीख, विधी आणि महत्त्व

राज्यशासनाचा निर्णय! प्रत्येक भूखंडाला आता भू आधार क्रमांक; राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी, वाद कमी होणार

Leopard Attack in Karad : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला; अधिराज पाटील जखमी, निवडणूक प्रचारातून घरी परतताना बिबट्याची झडप

SCROLL FOR NEXT