Raj Thackeray gives responsibility of Party restructure to Sudhir Pataskar 
पुणे

मनसेच्या संघटनात्मक बांधणीचे दोर बारामतीकरांच्या हातात

मिलिंद संगई

बारामती : राज्यात एकीकडे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर बारामतीचे महत्त्व राजकीय पटलावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील कात टाकताना एका बारामतीकरावरच संघटनात्मक बांधणीची जबाबदारी सोपविली आहे. बारामती येथील नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. सुधीर पाटसकर यांच्यावर खुद्द राज ठाकरे यांनी नव्याने संघटना बांधण्याची जबाबदारी सोपविली असल्याचे मुंबईत काल झालेल्या मेळाव्यात जाहीर केले.

येत्या काळात सुधीर पाटसकर व वसंत फडके हे दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आपल्याला त्रास देतील अशा मिश्कील शब्दात राज ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीची जबाबदारी या दोघांवर सोपवीत असल्याचे जाहीर केले .

आपल्या झेंड्याचा रंग भगवा करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता नव्याने राजकीय कात टाकणार असल्याचे स्पष्ट केले. यात विशेष म्हणजे गेल्या काही काळात राज ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संबंध अधिक मधुर झाले होते, या पार्श्वभूमीवर आता एका बारामतीकरावर मनसेच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच सुधीर पाटसकर हे राज ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. त्यांच्या निष्ठेची दखल घेत त्यांच्यावर आता संघटनात्मक बांधणीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे . त्यामुळे मनसेच्या पटलावर देखील बारामतीतील स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT