Rana And Raj Thackeray Sakal
पुणे

मधू इथे, चंद्र तिथे! 'भावनिक' झालेल्या राणा दाम्पत्याला राज ठाकरेंचा टोला

राणा आणि राऊतांच्या लेह भेटीवरून राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं आहे.

वैष्णवी कारंजकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा अट्टाहास केल्याने अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. त्यानंतरही त्यांनी हनुमान चालिसेचा मु्द्दा लावूनच धरला होता. या दोघांवर राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेतून टीका केली आहे. तसंच त्यांच्यावर आरोप- प्रत्यारोप करणारे संजय राऊत लेहमध्ये त्यांच्यासोबतच जेवत होते, यावरूनही टीका केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, ते आपल्या विरोधात एकत्र येतात, बाकी वेळी भांडत असतात. म्हणजे बघा ना ते राणा मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेले होते. अरे मातोश्री बंगला काय मशीद आहे का?त्यांना अटक केली, मग ते आत होते, मधू इथे आणि चंद्र तिथे, मग ते एकत्र आले, त्यांना सोडलं. शिवसेनेकडून वाट्टेल ते बोलले, शिवसेना वाट्टेल ते बोलली. एवढ्या सगळ्या ड्रामानंतर हे दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. ज्यांच्यामुळे एवढं प्रकरण घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही जेवताय, खांद्यावर हात ठेवून फिरताय. ह्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे.

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. राणा दाम्पत्याला तुरुंगात जावं लागलं होतं. १२ -१३ दिवस कारागृहात राहिल्यानंतर अखेर या दोघांची भेट झाली. तेव्हा हे दाम्पत्य भावनिक झालेलं दिसून आलं. त्यावेळी त्यांचे रडतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. तर राणा दाम्पत्यावर या दरम्यान जोरदार टीका करणारे संजय राऊत लेहमध्ये त्यांच्याच सोबत गप्पा मारत जेवण करताना दिसले. यावेळचेही फोटो व्हायरल झाले होते. त्यावरूनही बऱ्याच चर्चा घडल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT