Raj Thackeray Hanuman Maha Aarti  Hanuman in Hanuman Temple
Raj Thackeray Hanuman Maha Aarti Hanuman in Hanuman Temple sakal
पुणे

पुणे : राज ठाकरेंनी केली हनुमानाची महाआरती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.१६) हनुमान जयंतीदिनी पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात हनुमानाची महाआरती केली. मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. हे भोंगे न उतरविल्यास, मशिदीपुढे स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असा आदेशही त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला होता.

या घोषणेनंतर ठाकरे यांनी पुण्यात हनुमानजयंतीदिनी महाआरती करणार असल्याचेही दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे शनिवारी पुण्यात महाआरतीसाठी दाखल झाले. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांच्या या महाआरतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे सामुदायिक पठन करण्यात आले. यानिमित्ताने मनसेच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, उत्साह, गोंधळ आणि शक्ती प्रदर्शनासाठीची जोरदार घोषणाबाजी असे चित्र यावेळी पहावयास मिळाले.

Raj Thackeray Hanuman Maha Aarti Hanuman in Hanuman Temple

मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी या महाआरतीचे आयोजन केले होते. महाआरतीच्यावेळी ठाकरे यांच्यासमवेत मनसेचे नेते बाळ नांदगावकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, मनोज चव्हाण, बाळासाहेब शेडगे, रणजित शिरोळे आदी उपस्थित उपस्थित होते. या महाआरतीमुळे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या ट्रॅकवर इंजिनला सुरवात केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांनी भगवी शाल पांघरून ही आरती केली. त्यामुळे मनसेची पुढची दिशा काय असणार, अशी चर्चा पुणे शहरात रंगली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) शनिवारी सकाळपासूनच देशभरात यंदाची हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील भाजपने हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मनसेच्यावतीने याला साद देण्यात आली. पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर हे १५० वर्षे जुने आहे. या मंदिराची भिंत एका अपघातात सुमारे दोन दशकांपूर्वी पडली होती. त्यावेळी हे मंदिर नव्याने बांधताना या मंदिराचे भूमीपूजन राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यामुळे हनुमानाच्या महाआरतीसाठी ठाकरे यांनी मुद्दामहून या मंदिराची निवड केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT