Raj Thackeray addressing party leaders ahead of Pune Municipal Election 2025 with key political strategies. sakal
पुणे

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Raj Thackeray on Pune Muncipal Election: तयारी लागण्याचा आदेश देत, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Raj Thackeray’s Key Instructions for Party Leaders :महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज(शनिवार) पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेत, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेशही दिला.

याशिवाय, मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे त्या संदर्भात सर्वांनी लक्ष द्यावे. राहुल गांधी यांनी जो मत चोरी संदर्भात आवाज उठवला आहे, त्याबाबत सर्वांनी आपल्या प्रभागात लक्ष देऊन मतदार यादींबाबत जनजागृती करा.  असं राज ठाकरेंनी सांगितलं

तसेच, मतदार याद्यांवर सर्वांनी काम करावे. असे सांगितले. यानंतर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी हात वर करा, असे राज ठाकरेंनी म्हटले व त्यांचे सर्वांचे फोटोही राज ठाकरे यांनी काढल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ४० माणसामागे दोन बी एल ए नेमा, याबाबत कुणी कुचराई केली तर त्या प्रभागात मी निवडणूक लढवणार नाही. असंही यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती आहे.

तर पुण्यात आलेल्या राज ठाकरेंना पुण्यातील वाहतूक कोंडीचाही फटका बसल्याचे समोर आले. सोन्या मारुती चौकापासून ते फडके चौकापर्यंतचा अवघा पाच मिनिटांचा रस्ता पार करायला, राज ठाकरेंच्या वाहन ताफ्यास २५ मिनिटे लागली. यावेळी रस्त्यावरील पुणेकरांनाही मनस्ताप झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT