Vasant More News | MNS News Updates 
पुणे

मशिद भोंगे प्रकरण : मनसेला आता वसंत ना'पसंत'; शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी

साईनाथ बाबर नवीन शहराध्यक्ष असतील, अशी घोषणादेखील राज ठाकरे यांनी केली केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मशिदींवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय खुद्द मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. दरम्यान, साईनाथ बाबर (Sainath Babar) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन शहराध्यक्ष असतील, अशी घोषणादेखील राज ठाकरे यांनी केली केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये दुफळीचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. (MNS Vasant More Dismiss From Post Of Pune City President)

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरण मनसेमधील अंतर्गत वादालाच जास्त कारणीभूत ठरल्याचं दिसून येतंय. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात नाराजीनाट्य रंगताना दिसून येत आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सर्वप्रथम माध्यमांसमोर येत यासंदर्भातील आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आज मुंबईला बोलावून घेतले होते. मात्र, यामध्ये वसंत मोरेंचाच सहभाग नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीच वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं काय प्रकरण?

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी 'यू टर्न' घेतला असा टीकेचा सूर होताच, शिवाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला कृती कार्यक्रमही वादग्रस्त ठरला. मशीदीच्या समोर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावा, असे आदेश ठाकरेंनी दिले. यानंतर राज्यात धार्मिक द्वेष वाढीस लागत असल्याचं बोललं जातंय.

मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं म्हटलं. काही ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्याची तयारी सुरू होती. अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र, पुण्यात काही मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलं होतं. (Raj Thackeray)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT