pune  sakal
पुणे

Pune : एकता नगरी परिसरात पूर बाधित भागात राज ठाकरे यांनी दिली भेट

पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्यादा एफएसआय देण्याबाबत शब्द दिला आहे, मुळा मुठा नदीपात्रातील अनाधिकृत गोष्टीवर कारवाई करून त्या बाहेर काढणे, डेक्कन परिसरात विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच इतर मदत केल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

जागृती कुलकर्णी

सिंहगड रस्ता : पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्यादा एफएसआय देण्याबाबत शब्द दिला आहे, मुळा मुठा नदीपात्रातील अनाधिकृत गोष्टीवर कारवाई करून त्या बाहेर काढणे, डेक्कन परिसरात विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच इतर मदत केल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

एकता नगरी परिसरात पूर बाधित भागात राज ठाकरे यांनी भेट दिली; त्यावेळी येथील नागरिकांना तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊन येईल असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे राज ठाकरे आज पुन्हा या भागात नागरिकांची संवाद साधण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नागरिकांना माहिती दिली.

या भागातील इमारतींचे पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून त्यांना पुनर्वसनासाठी जादा एफएसआय देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच मुळा मुठा नदीपात्रात पडलेल्या अनाधिकृत राडारोड्यामुळे पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. त्यानुसार त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

डेक्कन परिसरात जे दोन तरुण पुराच्या पाण्यात विजेचा धक्का लागून गेल्याने मृत्युमुखी पडले त्यांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये देण्यात आले. तसेच एका तरुणाच्या भावाला सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी तजवीज करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच पूर नियंत्रण बाबत तसेच येथील समस्या समजून घेण्यासाठी पाटबंधारे पुणे महापालिका यांच्यासह तज्ज्ञ माणसांची कमिटी समिती स्थापन करण्यात यावी त्यांच्या चर्चेतून हे प्रश्न सोडवण्यात यावे अशी माहिती त्यांनी यावेळी सांगितली. दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे जे नुकसान झाले आहे त्यावर संबंधित विमा कंपन्यांनी नागरिकांचे विमा करून द्यावे असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी ठाकरे यांच्यासह मनसेचे शिवाजी मते, गणेश सातपुते आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पूरबाधित क्षेत्रासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे महापालिका अग्निशमन केंद्र, पीएमआरडीए अग्निशमन केंद्र तसेच सैन्य दलाच्या जवानांची एक विशेष तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

Social Media Impact : सोशल मीडियावर अर्ध-नग्नता; समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम काय असू शकतो?

Ajit Pawar: ''ज्यांनी हे पाप केलं असेल त्यांच्या घरात...'', अमोल मिटकरींच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Railway Ticket: रेल्वे प्रवास महाग होणार! ट्रेन तिकिटांच्या किमती किती वाढणार? आकडेवारीतून माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT