rajani banana farmers export their banana in iraq 30 farmers got benefit  Sakal
पुणे

Banana farming : रांजनीची केळी इराणला; केळीपिकातून अवघ्या एक वर्षात ३० शेतकरी लखपती

३० शेतकऱ्यांनी एकत्र येत ५० एकरावर केळी पिकाची लागवड करून गट शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला

नवनाथ भेके निरगुडसर

निरगुडसर : रांजणी ता.आंबेगाव येथील ३० शेतकऱ्यांनी एकत्र येत ५० एकरावर केळी पिकाची लागवड करून गट शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. केळीच्या पहिल्या तोड्याला प्रति किलो २३.५० दर मिळाला असून रांजणीची केळी थेट इराकला निर्यात होत आहे,यातून ५० एकरावर १५०० टनाहून अधिक उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून सध्याच्या बाजारभावानुसार तीन कोटीहून अधिक उत्पन्न मिळणार आहे.

यातून सर्वच्या सर्व ३० शेतकरी अवघ्या एक वर्षात लखपती बनले आहेत. आंबेगाव,जुन्नर,खेड, शिरुर तालुक्यांमध्ये मुख्य पीक म्हणून ऊस,कांदा,बटाटा या पिकांची ओळख आहे,परंतु येत्या काही वर्षात वाढलेला उत्पादन खर्च आणि त्यातुलनेत न मिळणारा बाजारभाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, या पिकांमध्ये 'व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी' अशी गत आहे.यावर उपाय शोधण्याचा यशस्वी प्रयत्न आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

रांजणी येथील शेतकऱ्यांनी गट करून अभ्यास दौरा करत जळगावसह इंदापूर तालुक्यातील टेंभुर्णी,अकलूज येथील केळी शेतीला भेटी देऊन माहिती घेतली तसेच विविध केळी निर्यात केंद्र व कोल्ड स्टोरेजची पाहणी करून निर्यातीची प्रक्रिया समजून घेतली आणि केळी लागवडीचा निर्णय घेतला,या अगोदर कांदा,बटाटा,ऊस आदी नगदी पिकांच्या बाजारभावाला कंटाळलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले निम्मे निम्मे क्षेत्र केळी लागवडीसाठी वापरले त्यानुसार शेतकरी श्याम भोर,सतीश वाघ,पांडुरंग निकम, सूर्यकांत वाघ, अजित धुमाळ, ज्ञानेश्वर निकम, निवृत्ती निकम, विठ्ठल निकम, किशोर निकम, निलेश भोर, तुकाराम वाघ नारायण वाघ,

अशोक वाघ धनंजय भोर,रवी थोरात,सोमनाथ सोनवणे,विजय थोरात,संतोष वाघ यांच्यासह एकूण ३० शेतकऱ्यांनी ५० एकर क्षेत्रावर जानेवारी २०२३ मध्ये जैन केळी रोपांची लागवड केली,प्रत्येक बागेला डबल ड्रीप नळी टाकून त्याद्वारे पाणी व खत व्यवस्थापन केले. जुलैमध्ये घड बाहेर पडल्या नंतर घड व्यवस्थापन करण्यास सुरवात केली, त्यामध्ये बड इंजेक्शन,फुले काढणे,फण्या कमी करणे व रस शोषणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावापासून केळीला वाचाविण्याकरिता आवश्यक फवारण्या घेण्याची कामे केली.

दहा ते अकरा महिन्यानंतर केळी कापणीस सुरवात झाली असून पहिल्याच प्रयत्नात आपली केळी इराकला निर्यात होत असल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.पहिल्या कापणीला २३.५० रुपये प्रति किलोचा दर मिळाला असून दर टिकून राहिल्यास प्रति एकर खर्च वजा जाता ४ ते ५ लाख रुपये निव्वळ नफा अवघ्या एक वर्षात मिळणार आहे.सर्व शेतकऱ्यांना केळी तज्ञ तुषार जाधव व महेंद्र भोर यांनी शेतावर येऊन मार्गदर्शन केले आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये गेल्या ३० ते ३५ वर्षापासून केळी पीकाची लागवड केली जाते.सुरवातीला हुंडेकरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केळीच्या कंदाचे वाटप करून लागवडी व्हायच्या. कालांतराने कंदाची जागा टिशु कल्चर केळी रोपांनी घेतली परंतु लागवडीच्या पद्धती,अन्नद्रव्य व्यवस्थापन व घडांची निगा या गोष्टी मात्र पारंपरिक पद्धतीनेच केल्या जायच्या परंतु आता आधुनिक पद्धतीने शेती पिकवल्यामुळे खर्चात बचत झाली,चांगल्या उत्पादनाबरोबरच चांगला दर आणि निर्यातक्षम फळ मिळाले.

*खर्च:रोपे,मजुरी,खते,औषधे यासाठी एकरी दीड लाख रुपये खर्च आला असून ५० एकरसाठी ७५ लाख रुपये *खर्च,खते,औषधे,रोपे एकत्रित घेतल्याने खर्चात बचत. *लागवड केल्यापासून दहा ते अकरा महिन्यात केळी काढणीला.

पहिल्या तोड्याला प्रति किलो दर २३.५० रुपये दर. *एकरी तोड्यातून ३० टन आणि ५० एकरमधून १५०० टन मालाचे उत्पादन मिळण्याचा विश्वास.

सध्याच्या बाजारभावानुसार ३ कोटीहून अधिक रुपयांचे उत्पादन

खर्च वजा जाता एकरी ४ ते ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा आणि ५० एकरवर दोन ते अडीच कोटी नफा मिळणार आहे.

रांजणी ता.आंबेगाव येथील शेतकरी श्याम भोर म्हणाले की,कांदा बटाटा,ऊस आदी नगदी पिकांच्या बाजारभावाला आम्ही कंटाळलो आहे त्यामुळे पिकामध्ये फेर बदल करण्याचा निर्णय घेतला परंतु केळी पिकाचा अनुभव नवीन असल्याने निम्मे निम्मे क्षेत्रच लागवडीसाठी वापरले,

सध्या माझी चार एकरवर केळी पीक असून पहिल्या तोड्यातच ३६ टन मालाचे उत्पन्न मिळाले असून अजून पुढील काही तोड्यात अजून ८० टनापर्यंत असे एकूण ११६ टन उत्पादन मिळण्याचा विश्वास आहे,सध्याच्या बाजारभावानुसार प्रती किलो २३.५० रुपये भाव मिळाला तर खर्च वजा २० लाख रुपयांचा निव्वळ नफा अवघ्या एक वर्षात शिल्लक राहणार आहे त्यामुळे पुढील वर्षी संपूर्ण शेतीवर केळी लागवड करणार आहे.

केळी पीक तज्ञ, तुषार जाधव म्हणाले की,खेड,जुन्नर आंबेगाव,शिरूर तालुक्यातील जमिनी व हवामान हे केळी लागवडीस पोषक आहे.२० वर्षापासून या भागातून केळीची निर्यात व्हावी हा प्रयत्न होता.निर्यातीच्या दृष्टीकोनातून केळी पिकाचे व्यवस्थापन केल्यास भविष्यात फार मोठी संधी या भागातील शेतकऱ्यांना आहे

कारण जिथून हा माल विदेशात पाठविला जातो ते जेएनपीटी पोर्ट फक्त 4 तासाच्या अंतरावर आहे.निर्यात करण्याचा उद्देश ठेवून केळीच्या पिकांची जोपासना केली व निर्यात करण्यायोग्य केळी निर्माण केली याचा मनस्वी आनंद आहे.फोटो खाली ओळ:रांजणी ता.आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत ५० एकरावर केळी पिकाची लागवड करून गट शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT