Phone_Tapping 
पुणे

धक्कादायक! मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे फोन टॅप

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यापासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. राज्यातील ठिकठिकाणचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्व समन्वयकांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी बुधवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत
केला. ही फोन टॅपिंग त्वरित थांबवा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे
सर्व समन्वयक प्रयत्न करत आहेत. यासाठी सर्वजण एकमेकांशी मोबाईलद्वारे
चर्चा करत असतात. परंतु मागील आठवडाभरापासून सर्व समन्वयकांच्या मोबाईलमध्ये बोलताना वेगळ्या पद्धतीचे आवाज येऊ लागले आहेत. याबाबत
तांत्रिक माहिती घेतली असता, फोन टॅप होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

समाजाचे सर्व नेते राज्य सरकारला प्रथमपासून सहकार्य करत आहेत. त्यामुळे
पोलिसांनी किंवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणांनी असे फोन टॅप करू नयेत, अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. या फोन टॅपिंगची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिली जाणार आहे. पूर्वीही असा प्रकार झाला होता, असेही कोंढरे यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT