raj.jpg 
पुणे

राजगुरूनगर नगरपरिषदेबाबत खळबळजनक बातमी

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये झालेल्या मालमत्ता करातील ३९ लाख ७ हजार रुपयांच्या बहुचर्चित अपहारप्रकरणी नगरपरिषदेच्या ६ कर्मचाऱ्यांवर, नगरपरिषदेकडून अखेर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर अशोक मारणे, सुनील सीताराम भालेराव, आशा पंडित पोखरकर, गणेश बाळकृष्ण देव्हरकर, महेश विष्णू घुमटकर, काळूराम संभाजी नाइकरे या सहा कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी वेळोवेळी राजगुरूनगर नगरपरिषदेची कर वसुलीची व सर्वसाधारण वसुलीची रक्कम भरून घेऊन त्या रकमेची ग्राहकांना पावती दिली. मात्र कर स्वरूपात स्वीकारलेली एकूण ३९ लाख ७ हजार रुपयांची रक्कम, चलन न करता ती अप्रामाणिकपणे स्वतःकडे ठेवून त्या रकमेचा अपहार केला.

तसेच नगरपरिषदेची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी युवराज विरणक यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी भा. द. वि. कलम ४२०, ४०९, ४०३ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी पुढील तपास करीत आहेत.

प्रकरण काय...स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडून करण्यात आलेल्या, राजगुरूनगर नगरपरिषदेच्या २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या विशेष लेखापरीक्षणात गंभीर बाबी आढळल्या होत्या.  मालमत्ता कर व अन्य जमा रकमांपैकी सुमारे ७७ लाख रुपयांची रक्कम नगरपरिषदेकडे जमा न करता अपहार केल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर काही रक्कम संबंधितांकडून पुन्हा भरण्यात आली. दरम्यान दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चार नगरसेवक आणि भीमशक्ती संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांनी मागण्या, निवेदने आणि आंदोलने केली होती. याप्रकरणी शेवटी आज गुन्हा दाखल करण्यात आला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा भाईंदर जैनांची नगरी, भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद; उलटे-सुलटे धंदे बंद करण्याचा मनसेचा इशारा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांचा 'अकरा प्लस'चा डाव, अध्यक्षपदासाठी चुलत भावाचंही नाव; आमदार पडळकरांचा गंभीर आरोप

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT