पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रस्ता - राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव. या वेळी (डावीकडून) संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, ॲड. मिलिंद पवार, कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ.
पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रस्ता - राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव. या वेळी (डावीकडून) संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, ॲड. मिलिंद पवार, कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ. 
पुणे

राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जतन करा - जाधव

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘‘स्वतःसोबतच इतरांचेही जीवन प्रकाशमान व्हावे, या विचारांनी गरजू विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे,’’ असे प्रतिपादन मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केले. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘राजर्षी शाहू महाराज महोत्सवा’प्रसंगी ते बोलत होते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश निरीक्षक विकास पासलकर म्हणाले, ‘‘शाहू महाराजांचे विचार हे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची गरज आहे, तरच समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळेल. गरजूंना मदत करण्याचा विचार सर्वांनी आत्मसात करावा.’’ याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार उपस्थित होते.

मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, विजय महाराज बारस्कर, राजेंद्र कोंढरे, कोमल पवार, संजय गायकवाड, पत्रकार शिरीष रणदिवे, क्रीडापटू समर्थ पांढरबळे, अंशुमन धावडे, युवराज सूर्यवंशी, अभिनेता योगेश तनपुरे यांना ‘राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे लहू पडवळ, धोंडिबा घारे, तानाजी चिकणे, संदीप खाटपे यांना ‘परिवर्तन दूत’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 

या वेळी संस्थेच्या विशेषांकाचे आणि संतोष तळेकर यांच्या ‘आदर्शाचे मानबिंदू’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, अनिल माने, मंदार बहिरट, सौरभ भिलारे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT