Raju_Shetti 
पुणे

Farmers Protest: अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढणार; राजू शेट्टींनी फुंकलं रणशिंग

सकाळ वृत्तसेवा

Farmers Protest: पुणे : देशातील काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवे कृषी कायदे केले आहेत. या कायद्यांचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे, तर मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता.१६) पुण्यात पत्रकार परिषदेत केला.

केंद्र सरकारच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर येत्या २२ डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी आज पुण्यात पत्रकारांशी  संवाद साधला. शेट्टी म्हणाले, "२२ डिसेंबरला वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यात राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव देखील सहभागी होणार आहेत."

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. 

शेतकरी संघटनांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

''सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना नोटीसा बजावल्या आहेत. रस्ता रोखणाऱ्यांची नावे मागवली आहेत. केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांना खरंच काही द्यायचं असेल, तर हमीभाव द्या. उगाच त्यांच्यावर नको असलेले कायदे लादू नका", अशी मागणी  राजू शेट्टी यांनी यावेळी केली. यासोबतच मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही एकत्र आल्या असल्याचं त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT