पुणे

राजू शेट्टी म्हणतात, 'ईडीमार्फत 'कडकनाथ'ची चौकशी करा, नाहीतर...'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कडकनाथ गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह प्रजा लोकशाही परिषदेकडून 'ईडी'च्या कार्यालयावरच मोर्चा काढू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला.

कडकनाथ गैरव्यवहार प्रकरण केवळ कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तर त्याची व्याप्ती महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांपर्यंत पोचली आहे. कडकनाथ प्रकरणांमध्ये ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, अशा शेतकऱ्यांची तक्रार संबंधित जिल्ह्यातच दाखल करून घ्यावी आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण मार्फत तपास करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संबंधित जिल्हा पोलिस प्रमुखांनी होकार दर्शविला आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत शेट्टी म्हणाले, मी त्यांची मागील आठवड्यात भेट घेऊन सध्याचा भारतीय जनता पक्ष हा वाजपेयी-मुंडेंचा पक्ष राहिलेला नाही. तर, मोदी-फडणवीस यांचा पक्ष आहे. भाजपमध्ये जात असल्यास धोके तपासून पाहा, असा सल्ला आपण त्यांना दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT