Raju Shetty Criticise on CM Uddhav Thackreay in Market yard Pune 
पुणे

Video : मुख्यमंत्र्यांना वाटते आपण शेतकऱ्यांचे तारणहार : राजू शेट्टी

प्रविण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : कर्ज माफी हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा एकमेव उपाय नाही. परंतु मुख्यमंत्री ज्या पद्धतीने म्हणतात कि कर्ज माफी हे पहिले पाऊल आहे. पण तुमचं पहिले पाऊलच अडखळत पडत असेल तर सरकारच्या एकूण भुमीकेबद्दल संशय यायला लागतो किंवा सरकारला अजून शेतकऱ्यांचे प्रश्न समजलेले दिसत नाहीत. आताची कर्ज माफी ही एकदम तकलादू, बिनकामाची आणि शेतकऱ्यांना आजीबात उपयोगाची नाही. याबाबत त्यांची चर्चेची सुद्धा तयारी नाही. त्यांना असं वाटत आहे की आपल्याला सर्वच समजले आणि कळलेले आहे आणि आपण शेतकऱ्यांचे तारणहार आहोत. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

कृषी उत्पन्न बाजार समितीला शेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. बाजार समितीच्या वतीने प्रशासक बी जे. देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. उपसचिव सतीश कोंडे, साह्यक सचिव दीपक शिंदे, अभियंता अरविंद फरतडे, उपअभियंता प्रमोद तुपे, विभाग प्रमुख बाबा बिबवे यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी आणि व्यापारी उपस्थित होते.


काँग्रेसला धक्का; दिग्गज नेत्याच्या मुलानेच केला भाजपमध्ये प्रवेश

शेट्टी म्हणले, मागील सरकारचा बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार हा निर्णय चांगला होता. कारण बाजार समित्या या शेतकऱ्यांसाठी उभारल्या आहेत. बाजार समित्या या शेतकऱ्यांसाठी मंदिरे बनवीत असे शरद जोशी म्हणायचे परंतु त्या तर कत्तलखाना आणि शेतकऱ्यांच्या शोषणाच्या अड्डा बनल्या आहेत. हे अड्डे दुरुस्त करायचे असतील तर शेतात काम करणारा शेतकरीच बाजार समितीत निवडून जायला हवा. सरकारने शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार रद्द करून घोड चूक केलेली आहे. भविष्यात त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. ज्या बाजार समित्या तोट्यात चालू आहेत. त्या बाजार समित्यांना शेजारच्या बाजार समितीत विलीन करून मार्ग काढायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना बीडमध्येच एवढा पाठिंबा का मिळतो? गेवराईत मराठा समाजातल्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान

जान्हवी जयंतला शिक्षा देणार! पण प्रोमो पाहून प्रेक्षक नाही झाले इम्प्रेस, "पुन्हा ये रे माझ्या मागल्या"

Sanjay Raut : नाशिक दत्तक घेतले मग समस्या का सुटत नाहीत? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Latest Marathi News Updates : जळगावात 17 सप्टेंबरला धडकणार शेतकरी जनआक्रोश मोर्चा

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

SCROLL FOR NEXT