Ramesh Kharmale from pune complete Trek on 11 forts and 3 peaks in 7 days 
पुणे

व्वा, कमालचं केली की,  पुण्यातील अवलियाने 7 दिवसात 11 किल्ले आणि 3 शिखरे केले सर

दत्ता म्हसकर

जुन्नर : जागतिक वारसा सप्ताहाचे औचित्य साधत जुन्नर तालुक्यातील वनरक्षक माजी सैनिक रमेश खरमाळे  यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी तेरा गडकोटांचा ट्रेक नुकताच पूर्ण केला आहे. निसर्ग भटकंतीची आवड असणाऱ्या खरमाळे यांनी सात दिवसात हा ट्रेक पूर्ण केला . सुमारे एक हजार कि.मी. प्रवास आपल्या चारचाकी वाहनातून तर १३४ कि.मी.चा पायी प्रवास करत एकूण तेरा किल्ले यशस्वीपणे पादक्रांत केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महाराष्ट्रातील सटाणा तालुक्यातील बागलान येथील सर्वात उंच असलेला साल्हेर व सालोटा किल्ला प्रथम पादक्रांत केला. दुसऱ्या दिवशी सलग २७ कि.मी पायी प्रवास करत  हरगड,  मुल्हेर,  मोरागड हे तीन किल्ले व ३ हजार ६०० पायऱ्या असलेले जैन धर्मीय मांगीतुंगी शिखरे देखील त्यांनी सर केली. यानंतर तीन दिवसांनी पुणे, अहमदनगर व ठाणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या दक्षिणेकडील रोहीदास व काळभैरवी शिखरावर स्वच्छता अभियान करत सुमारे २४ कि.मी.चा ट्रेक पूर्ण केला.  या प्रवासात त्यांनी जीवधन, निमगिरी, हडसर, शिवनेरी, प्रबळगड, साल्हेर, सालोटा, हरगड, मुल्हेर, मोरागड, चौल्हेर हे किल्ले तसेच मांगीतुंगी, रोहीदास व काळभैरवी शिखर सर केले आहे. त्यांच्या या धाडसी प्रवासाचे गिरिप्रेमीकडून कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

 "आपली वारसास्थळे नेहमीच संवर्धित केली पाहिजेत तसेच ती सतत प्रकाशझोतात आली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ शकतात. सरकारने या वारसा स्थळांच्या विकासाबाबत ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. या स्थळांचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन कार्य सुरू करून ही स्थळे जपली जातील यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. ही वारसास्थळे जेवढ्या जास्त प्रमाणात विविध मार्गांनी प्रकाशझोतात आणता येतील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. "
- रमेश खरमाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

CCTV Crime Footage : पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून पाठलाग करून भर रस्त्यात संपवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

India vs Pakistan Asia Cup 2025 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; दुबईतील भारतीय प्रेक्षकांचाही निरुत्साह, कारण काय?

Truck Accident: देऊळगाव महीजवळील भीषण अपघातात ट्रक पलटी; चालक नागेश दहिफळे यांचा जागीच मृत्यू

Panchang 14 September 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT