rangava sakal media
पुणे

मावळ तालुक्यात आढळला रानगवा!

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील (maval taluka) पाटण (patan) व भाजे (bhaje) डोंगर परिसरात रानगवा आढळून आल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.(rangava was found in patan, bhaje in maval taluka)

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पाटण व भाजे गावच्या डोंगरात रविवारी ग्रामस्थांना रानगव्याचे दर्शन झाले. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वनरक्षक व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी परिसरात गस्त घातली व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

या रानगव्याकडून कोणतेही नुकसान झाल्याच्या तक्रारी नाहीत. वनविभागाचे वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी सांगितले की, पवन मावळातील मोरवे भागात रानगव्याचे पहिल्यापासून अस्तित्व आहे. भटकत-भटकत तो पाटण-भाजे डोंगर परिसरात आला असावा. तो शांत स्वभावाचा प्राणी असून, त्याच्यापासून आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याच्या तक्रारी नाहीत. नागरिकांनी त्याचा पाठलाग करू नये अथवा त्याला डिवचू नये. तसे केल्यास तो चवताळू शकतो. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

BJP MLA Sanjay Upadhyay Threat : बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना पत्राद्वारे मिळाली जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

SCROLL FOR NEXT