rajangaon
rajangaon sakal
पुणे

रांजणगाव : अंगारकीनिमित्त महागणपती मंदिरात फुलांची सजावट

प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील अष्टविनायक महागणपती मंदिरात आज अंगारकी संकष्ट चतुर्थी कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. (ranjangaon Mahaganapati Flower decoration Angarki Sankashti Chaturthi)श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे पहाटे महागणपतीचा अभिषेक व पूजा करण्यात आली.

दुपारी महापुजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच उद्योजक संतोष गवारे यांच्याकडून १०१ डझन केळींचा महानैवेद्य श्री महागणपतीला दाखवण्यात आला. प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मुख्य गाभारा व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर नागरीकांना दर्शनासाठी पूर्ण बंद असून "श्रीं" ची दैनंदिन पूजा व धार्मिक विधी नियमित चालू आहेत. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॅा.संतोष दुंडे, प्रा.नारायण पाचुंदकर, ॲड.विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT