Crime Sakal
पुणे

पुणे : पंचतारांकित हॉटेलच्या मालकाकडे मागितली आठ कोटींची खंडणी

हॉटेल मालकाकडेच आठ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) एक पंचतारांकित हॉटेल (Hotel) भाडेतत्वावर चालविण्यास दिले असतानाही हॉटेल बंद करून संबंधीत हॉटेल मालकाकडेच आठ कोटी रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेल्स समुहाच्या संचालकांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

इंटर कॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप (इंडिया) प्रा. लि. च्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुदीप जैन (रा. वसंत विहार, दिल्ली), व्यवस्थापक नॉर्टन परेरा (रा. हरियाणा), संचालक व्यंकटेश गोमातम, अँजेलीन याप तसेच "क्राऊन प्लाझा' हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक फिनो बाबू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत न्युओ कॉर्पिकोन प्लाझा प्रा. लि. कंपनीचे संचालक दीपक रहेजा (वय 67, रा. जुहू, मुंबई) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक रहेजा यांच्या कंपनीचे बंडगार्डन रस्त्यावर "क्राऊन प्लाझा' नावाचे पंचतारांकित हॉटेल आहे. "क्राऊन प्लाझा' हे हॉटेल फिर्यादी यांनी 2016 मध्ये इंटर कॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप (इंडिया) प्रा. लि. या समुहाला चालविण्यास दिले होते. त्यानंतर रहेजा यांच्या "क्राऊन प्लाझा' हॉटेलमधील व्यवस्थापकीय संचालक फिनो बाबू यांच्याबरोबर संगमनत करून सुदीप जैन, नॉर्टन परेरा, व्यंकटेश गोमातम, अँजेलीन याप यांनी रहेजा यांच्याकडे पाच कोटी 86 लाख 97 हजारांची रक्कम थकीत असल्याचे कळविले होते. या वादातून रहेजा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा रहेजा यांच्याकडे 14 कोटी रुपयांची मागणी केली होती.

"क्राऊन प्लाझा' हॉटेलमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा, बॅगेज स्कॅनर यंत्रणा नादुरूस्त होऊन बंद पडली. त्यांनी 21 जुलै रोजी संबंधित हॉटेल बंद केले. रहेजा तसेच ग्राहकांना हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव करून फिर्यादीस धमकी दिली. त्यामुळे रहेजा यांनी त्यांना 85 लाख रुपये दिले. तरीही ते देय नसलेली आठ कोटी 13 लाख दोन हजार रुपयांच्या अवास्तव व जादा रकमेची खंडणी मागितली. तसेच न्यायालयात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची व हॉटेल बंद पाडण्याची फिर्यादीस धमकी दिली. रहेजा यांनी याबाबत तक्रार अर्ज दिल्यानंतर या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT