Union Minister of State for Food and Civil Supplies Raosaheb Danve Speaks About farmer laws 
पुणे

शेतकरयांपुढे एकीकडे असेल 'काटा' दुसरीकडे नोटा  : रावसाहेब दानवे

सकाळवृत्तसेवा

पुणे : गेली सहा वर्ष विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यातून ते ३ नव्या शेती कायद्यांवरून मोदी सरकारवर आरोप करत रस्त्यावर उतरत आहेत. केंद्र सरकार बाजार समित्या बंद करणार नाही, मात्र बाजार समितीतील गोंधळ कमी करणार आहे. या कायद्यांमुळे व्यापारी हे थेट शेतकरयांकडून माल खरेदी करतील. त्यामुळे शेतकरयांपुढे एकीकडे ‘काटा’ दुसरीकडे नोटा असतील अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री  रावसाहेब दानवे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेती कायद्यांवरुन विरोधकांनी जे काही आरोप केले त्याला प्रतिउत्तर देताना दानवे म्हणाले, ''गेल्या 6 वर्षांत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना कुठलाच विषय मिळाला नाही, म्हणून ते कृषी कायदेला विरोध करताहेत. शेतकऱ्याचा माल किमान आधारभूत किंमतीने विकला जाणार आहे. बाजार समित्या संपुष्टात येणार नाहीत. या कायदेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. स्पर्धा वाढल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. विरोधक चुकीचे आरोप करीत आहेत. ते खोडून काढण्याचे आमचे काम आहे. आम्ही विरोधकांना घाबरत नाही. आमच्याबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत आहे.''

पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास!

तसेच, ''महाराष्ट्रात अमर, अकबर आणि अँथनीचे सरकार आहे. ते पायात पाय अडकून पडेल. मात्र आम्ही सरकार पाडणार नाही,'' असा टोला त्यांना महा विकास आघाडी सरकारला लगावला.

''जीवनावश्यक वस्तू कायदा अस्तित्वात असल्याने कांदा निर्यातीवर निर्बंध घालावे लागतात, नुकसानग्रस्त शेतकऱ्याना एकरी 50 हजार देऊ'' असे महाराष्ट्राचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री म्हणाले होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्यावेत आता, अशी मागणी देखील दानवे यांनी यावेळी केली.

MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT