rape sakal
पुणे

नोकरी देण्याच्या निमित्ताने ओळख झालेल्या महिलेवर बलात्कार

नोकरी देण्याच्या निमित्ताने ओळख झालेल्या महिलेवर दोन व्यापाऱ्यांनी बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नोकरी देण्याच्या निमित्ताने ओळख झालेल्या महिलेवर दोन व्यापाऱ्यांनी बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - नोकरी (Job) देण्याच्या निमित्ताने ओळख झालेल्या महिलेवर (Women) दोन व्यापाऱ्यांनी (Businessman) बलात्कार (Rape) करुन अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी दोन व्यापाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे.

भरत जेठामल गांधी (वय 53, रा. एकबोटे कॉलनी), दिलीप पुष्कराज ओसवाल (वय 53, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने कोरेकाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिपाली भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत गांधी हा सोन्याचा व्यापारी आहे. तर दिलीप ओसवाल हा धान्याचा व्यापारी आहे. पिडीत महिला तिच्या पतीसमवेत राहात नाही. तिला नोकरीची गरज असल्याने एका मैत्रीणीच्या माध्यमातून तिची भरत गांधीशी ओळख झाली. त्याने महिलेस त्याचा मित्र ओसवाल याच्याकडे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी लावून दिली. त्यानंतर महिलेच्या असाहयतेचा गैरफायदा घेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. मागील चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.

महिलेवर कोरेगाव पार्क, शिवाजीनगर येथील हॉटेल, संशयित आरोपीचे कार्यालय आणि शुक्रवार पेठेतील एका सदनिकेमध्ये अत्याचार झाल्याचे महिलेने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी शनिवारी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना पोलिसांनी रविवारी दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिपाली भुजबळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, घिरट्या घालत अचानक जमिनीवर कोसळले; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर

Aadhaar Updates : UIDAI च्या नवीन सूचना! आधार कार्ड स्कॅमपासून वाचण्यासाठी करा ही 5 कामे

Panhala Forest Ban : पन्हाळ्यातील वनक्षेत्रात पर्यटकांना नो-एन्ट्री! 'या' तारखेपर्यंत वन विभागाकडून नाकाबंदी, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : नागपुरमध्ये भाजप उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार

Jalgaon Municipal Election : जळगावात युतीची गाडी घसरली? जागावाटपावरून खडाजंगी, गुलाबराव पाटील तावातावात बाहेर!

SCROLL FOR NEXT