Shubham Jadhav_Rapper 
पुणे

Rapper Shubham Jadhav: "गाण्यात समाजाचं प्रतिबिंब, त्यामुळं चिडायची गरज नाही"; रॅपर शुभमनं मांडली भूमिका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शूट केलेल्या रॅपसाँग प्रकरणी शुभम जाधववर गुन्हा दाखल झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शूट केलेल्या कथीत अश्लिल रॅप साँगप्रकरणी शुभम जाधव या रॅपरवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण आपलं गाणं अश्लिल नाही, उलट सकारात्मक विचार मांडणार आहे, असा दावा शुभमनं केला आहे. या गाण्यातून समाजाचं प्रतिबिंब दिसतं त्यामुळं समाजानं चिडायचं कारण नाही, असंही त्यांनं म्हटलं आहे. (no need to get angry because of filth of society Rapper Shubman gives an explanation on controversy)

रॅपर शुभम जाधव ऊर्फ रॉकसन यानं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "शिव्या देणं जर गुन्हा असेल तर भारतात गुन्हेगारांना गजाआड करायला पोलीस चौक्या कमी पडतील. आम्ही कलाकार आहोत, समाजाचा आरसा आहोत. आपलं प्रतिबिंब एवढं घाण आहे म्हणून समाजानं एवढं चिडायची गरज नाही. शिवी देणं हा गुन्हा होऊ शकत नाही. नामदेव ढसाळ, मन्टो, ग्रेस यांच्या कवितांमध्ये शिव्या आहेत"

गाण्यात सकारात्मक विचार मांडला

यापूर्वी मी केलेली गाणी 'माझा बाप पांडुरंग', 'लाल दिव्याची गाडी' या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांवरील गाणं आहे. मुद्दा असा आहे, माझं हे 'सल्तनत' नावाचं जे गाणं आहे हे वर्ल्डवाईड व्हायरलं झालं आहे. ते त्यातील व्हिज्युअल्स आणि मुझिकमुळं. या व्हिडिओत मी एक चांगला सकारात्मक विचारही मांडला आहे, तो महाराष्ट्राला दिसला नाही त्यातल्या फक्त शिव्याच दिसल्या का? असा सवालही त्यानं विचारला आहे.

शुटिंगसाठी रितसर परवानगी घेतली होती

तो असंही म्हणाला की, "मी महाराष्ट्राला पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की, विद्यापीठाची परवानगी न घेता गाण शूट केलं हा आरोपच खोटा आहे. मी यासाठी रितसर परवानगी घेतली होती, फक्त ती लेखी न मिळता तोंडी मिळाली होती. फोनवरुन मला रजिस्ट्रार प्रफुल्ल पवार सरांनी ही परवानगी दिली होती. विद्यापीठाकडं आम्ही लेखी परवानगी मागण्यासाठी गेलो होतो, त्यांना पत्रही दिलं त्यावर विद्यापीठाचा शिक्काही आहे. पण त्यांनी आम्हाला तोंडी परवानगी दिली.

तर गाणं डिलीट केलं असतं

विद्यापीठात आम्ही एकदोन मिनिटं शूटिंग केलेलं नाही तर सहा तास शूटिंग करत होतो. रविवारी संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत आम्ही तिथं शुटिंग केलं होतं. त्यामुळं मी परवानगी न घेता शूट केल्याची विद्यापीठानं माझ्यावर खोटी तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख झांबरे यांनी विद्यापीठात तसेच विद्यापीठीनं पोलिसांत जाण्याऐवजी आधी मला याबाबत विचारणा केली असती तर मी हे गाणं युट्यूबवरुन हटवलं असतं, असंही रॅपर शुभम जाधव यानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rains : पुणे जिल्ह्यातील धरणांवर २४ तास कार्यरत यंत्रणा; पूरस्थितीवर अधिकारी सज्ज

'आणि काय हवं' नंतर उमेश-प्रिया हटके सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस ! 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर VIRAL

Pune Traffic Update : बाणेर-बालेवाडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती

Latest Maharashtra News Updates Live: शिवसैनिकांचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा,पोलिसांनी अडवले

Vegetable Video : पावसाळ्यात कोबी-फ्लॉवर घेताना 10 वेळा चेक करा; बघा त्यातून काय निघालं, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT