rare species of The Sand Boa snake was saved in pune and to detain katraj snake park
rare species of The Sand Boa snake was saved in pune and to detain katraj snake park 
पुणे

दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळ सापाला मिळाले जीवनदान; कात्रज सर्पोद्यानाच्या ताब्यात

सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी(पुणे) : भारतातील दुर्मिळ प्रजातीमध्ये सामाविष्ट असलेल्या मांडूळ जातीच्या सापाला आज नगरसेवक भैय्यासाहेब जाधव व राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी आढळल्यानंतर सुरक्षितपणे बचाव करून पोलिसांच्या व त्यानंतर कात्रज सर्पोद्यानाच्या ताब्यात देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कुणाल मोरे यांना श्री 'हाॅस्पिटल' खराडी येथील जागेत अचानक हा साप आढळला होता. सापविषयी माहिती समजल्यांनातर नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किरण खैरे, उपाध्यक्ष सुहास तळेकर, वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मनोज पाचपुते, चेतन येवले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले. तत्काळ, कात्रज सर्पोद्यानाशी संपर्क साधला व सदर घटनेची माहिती कळवली. सदर प्रजाती ही दुर्मिळ असल्याने उद्या कात्रज उद्यान अधिकारी वर्गाला कळवून त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार होते. मात्र, तोपर्यंत चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये या सापाला सुपूर्त केले असून आवश्यक माहिती देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याविषयी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव म्हणाले,''अंधश्रद्धेमुळे मांडूळ सापाची तस्करीच्या घटना घडतात. कात्रज सर्पोद्यानाच्या कर्मचारऱ्याच्या हवाली केल्यानंतर सापाला सुरक्षित स्थळी निवारा मिळेल.''

बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्ण वाढताहेत; आता आणखी...

चंदननगर वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक गजानान जाधव यांनी उद्यान विभागाचे कर्मचारी केवीन राॅबर्ट डीकोस्टा यांच्याकडे मांडूळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ताब्यात दिले.

(Edited by : Sharayu kakade)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT