Rasta Roko movement on behalf of Maratha Kranti Morcha at Bhigwan 
पुणे

भिगवण येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन

प्रा. प्रशांत चवरे, भिगवण

भिगवण : मराठा समाजाच्या आरक्षणास दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न करावेत तसेच जोपर्यंत स्थिगिती उठविली जात नाही, तोपर्यंत राज्यातील नोकर भरतीवर बंदी आणावी आदी मागण्यांसाठी इंदापुर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्या वतीने येथील पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर केलेल्या या रास्ता रोको आंदोलनांमध्ये मराठा समाजातील तरुणांसह विविध राजकिय, सामाजिक, संघटना सहभागी झाल्या होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यामध्ये मराठा समाजाला देण्यात आलेल्या नोकरी व शैक्षणिक आरक्षणास कोर्टाने स्थिगिती दिल्याच्या पार्श्वभुमीवर इंदापुर तालुक्यामध्ये मराठा समाजांमध्ये असंतोष होता. नुकतेच तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आंदोलन केले होते. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणुन इंदापुर तालुक्यातील भिगवण येथे पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी  मोर्चा काढण्यात आला. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर येथील हॉटेल सागरच्या समोर पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला.

आंदोलनाचे नेतृत्व महिलांनी केले. यावेळी मराठा आरक्षणास मिळलेली स्थिगती उठविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, स्थगिती उठविली जात नाही तोपर्यंत राज्यांमध्ये कोणतीही भरती करु नये, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी, अण्णासाहेब पाटील महामंडळास १००० कोटींची तरतुद करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांचे निवेदन बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर व मंडल अधिकारी मकरंद तांबडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख यांचेकडे देण्यात आले.
    
वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनांमुळे पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक खोळंबली होती. आंदोलनानंतर पोलिसांनी वाहतुक सुरुळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT