पुणे

पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीबाबत होतीये 'ही' महत्त्वाची मागणी

महेश जगताप

स्वारगेट (पुणे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये  शारीरिक चाचणीसाठी असलेलं १:४ प्रमाणावरून १:६ करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी केली आहे.

"मागील काही वर्षांपासून पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे प्रमाण हे सरासरी ५५ टक्के आहे. तसेच, ४५ टक्के प्रमाण हे गैरहजर राहण्याचे आहे. यामुळे बरेच उमेदवार हे ५-६ वर्षांपासून तयारी करीत असतात, त्यांना संधी भेटायला हवी. ज्या प्रमाणे आयोगाने मुख्य परीक्षेसाठी प्रमाण वाढविले आहे. त्याचप्रमाणे येथे देखील विचार होणे आवश्यक आहे," असे मत दिनेश माने या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

"ही एक स्पर्धा असून, यात एवढ्या संख्येने उमेदवार गैरहजर राहत असतील; तर याला स्पर्धा म्हणायची का, हा प्रश्न पडतो. तसेच, बरेच उमेदवार हे सराव म्हणून परीक्षा देतात आणि शारीरिक चाचणीला जात नाहीत. तसेच संयुक्त परीक्षेमुळे ज्या उमेदवाराना पोलिस उपनिरीक्षक व्हायचे नाही, ते सुद्धा परीक्षा देतात. त्यांना घटनेने अधिकार दिला आहे. त्यावर आपल्याला काही करता येत नाही. पण, जर गैरहजर राहण्याचे प्रमाण एवढे असेल, तर आयोगाने या बाबत सकारात्मक विचार करून हे प्रमाण १:४ वरून १:६ करायला हवे. यामुळे आयोगाला योग्य असेलेले उमेदवार मिळतील. कारण शारीरिक चाचणीमध्ये ५० गुणदेखील पाडू न शकणारे मंडळी आहेत. याचा आकडा अंदाजे ५० आहे," अशी माहिती स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी महेश बडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आयोगाने यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन उमेदवारांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, अशी मागणी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Non Veg Milk: काय आहे 'नॉन-व्हेज दूध'? अमेरिका आणि भारताची चर्चा यावरच अडकली; शेतकरी मात्र चिंतेत

Latest Maharashtra News Updates : कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, विसर्ग वाढवला

Video : सुनेचा अमानुषपणा! ७८ वर्षीय सासूला चावली अन् डोळाच गेला, सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Latur News : निकटवर्तीयांकडून फसवणूक, आमदार देशमुखांच्या कंपनीत ९ कोटींचा गैरव्यवहार; सीईओंसह तिघांवर गुन्हा

Nashik News : ७२ नेते आणि अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात? गुप्त मिटवलेली प्रकरणे चर्चेत

SCROLL FOR NEXT