Ration shop close in Pimri Chinchwad
Ration shop close in Pimri Chinchwad 
पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वस्त धान्य दुकाने बंद; शिधा पत्रिकाधारकांच्या तक्रारी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी आणि चिंचवड भागात अनेकदा स्वस्त धान्य दुकाने बंद राहत आहेत. काहीवेळेस धान्य मिळण्यासही विलंब होतो. दुकानदार उलट उत्तरे देतात अशा तक्रारी शिधापत्रिकाधारकांनी केल्या आहेत. मात्र, दरमहा तक्रारीच्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली जात असून शिधापत्रिकाधारकांनी दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत स्वतःचे धान्य घेऊन जावे, असे आवाहन शहर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पिंपरी आणि चिंचवड विभागाने केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर अन्न व नागरी पुरवठा विभागाची शहरात पिंपरी (ज विभाग), चिंचवड (अ विभाग) आणि भोसरी (फ विभाग) कार्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी, पिंपरी विभागात 137 पैकी 78 स्वस्त धान्य दुकाने चालू असून उर्वरीत दुकाने या पूर्वीच बंद झाली आहेत. तर चिंचवड विभागात 148 पैकी 94 दुकाने चालू असून उर्वरीत दुकाने बंद आहेत. ई-पॉस मशीन यंत्रणा चालू होण्यापूर्वीच ही दुकाने बंद झाली आहेत. मात्र, उर्वरीत दुकानांपैकी बरीच दुकाने अनेकदा बंद राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. 

एक वर्षाच्या बाळाला घेऊन महिला कॉन्स्टेबल करतेय ट्रम्प यांच्या सुरक्षेचे काम

परिमंडल अधिकारी (अ व ज विभाग) दिनेश तावरे म्हणाले, "आमच्या विभागाकडून दरमहिन्याच्या 7 तारखेला अन्नदिन साजरा केला जातो. तर 8 ते 15 तारखेपर्यंत अन्न सप्ताहाचे आयोजन केले जाते. प्रत्येकवेळेस महिन्याभर अगोदर धान्याचे नियतन शहर कार्यालयाला कळवावे लागते. त्यानुसार, दर महिन्याला शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वितरण करण्याच्यादृष्टीने पुढील कार्यवाही केली जाते. धान्य वितरणाची प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने कोणत्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये किती धान्य शिल्लक राहिले आहे ? हे समजते. एखाद्या महिन्याला धान्य शिल्लक राहिल्यास त्याबाबत दुकानदाराकडे विचारणा केली जाते. त्यामुळे, दुकानदार शिधापत्रिकाधारकांना धान्य नेण्यासाठी वेळोवेळी कळवत असतात. मात्र, अनेकदा शिधापत्रिकाधारक महिन्याच्या अखेरीला धान्य घेण्यासाठी दुकानांत जातात. त्यामुळे, पुढील महिन्याच्या धान्य नियतनाबाबत कार्यवाही करण्यात अडचणी येतात. त्यामुळे, शिधापत्रिकाधारकांनी दर महिन्याच्या 15 तारखेच्या आत दुकानांमधून धान्य उचलावे.''

शिधापत्रिका ऑनलाईन करुन घ्या !
शिधापत्रिकेची 2012 पासून ऑनलाईन प्रक्रिया चालू झाली आहे. शिधापत्रिका ऑनलाईन करुन घेतल्यावर शिधापत्रिका धारकाला एफपीएस आयडीचा 12 अंकी क्रमांक मिळतो. शिधापत्रिका ऑनलाईन झाल्याशिवाय पुढील कार्यवाही करणे अशक्य आहे. त्यामुळे, शिधापत्रिकाधारकांनी स्वतःकडील शिधापत्रिका ऑनलाईन करुन घ्याव्यात, असे आवाहन दिनेश तावरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT