Ration shopkeepers on indefinite strike from today 
पुणे

रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर; 'या' आहेत त्यांच्या मागण्या

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या संकटात रेशनिंग दुकानदार जीवाची पर्वा न करता नागरिकांना धान्य वाटप करत आहेत. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे. धान्य वाटपाचे कमिशन देण्यात यावे. तसेच, सन्मानाची वागणूक मिळावी, यासह विविध मागण्यांची राज्य सरकारने दखल न घेतली नाही. त्यामुळे सर्व रेशन दुकानदार आज (ता.1) पासून बेमुदत संपावर गेल्याची माहिती महाराष्ट्र रेशनिंग दुकानदार संघटनेचे राहुल पोकळे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनामुळे एका रेशनिंग दुकानदाराचा नुकताच मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबेपर्यंत पॉस मशिनवरील  ग्राहकाप्रमाणे पोर्टेबिलिटी ग्राहकांचे बोटांचे ठसे घेणे तात्काळ रद्द करावे. सध्याचे कमिशन आणि दुकान चालवण्याचा खर्च यात प्रचंड तफावत असून, रेशनिंग दुकानदारांना प्रति महिना प्रति कार्ड 100 रुपये प्रमाणे मानधन देण्यात यावे. कोरोनाग्रस्त भागात धान्य वाटप करणे जीवावर बेतणारे असून, परिस्थिती पाहून वाटप करण्यास मुभा द्यावी. एपीएल आणि मोफत धान्य पुरवठा प्रक्रियेत रेशन दुकानदारांना कमिशन देण्यात यावे. रेशनिंग दुकानदाराचा कोरोनामुळे
मृत्यू झाल्यास सरकारमार्फत 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे. धान्य एकाच वेळी वाटप करता येईल, अशा प्रकारे धान्य पुरवठा व्हावा. मानसिक स्वास्थ बिघडू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी या काळात दुकानदारांवर दबाव टाकू नये.

गुड न्यूज गुड न्यूज : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा रेट मंदावतोय; वाचा सविस्तर आकडेवारी

रेशनिंग दुकानदारांना सुरक्षिततेसाठी हँड ग्लोवज, सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा करावा. सर्व रेशनिंग दुकानदार आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी. पोलिसांकडून होणारा त्रास थांबविण्यात यावा, यासह विविध मागण्या जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 
 

शहरातील रेशन दुकाने सुरू - अस्मिता मोरे 

रेशन दुकानदारांना विमा संरक्षण मिळण्याबाबत रेशन दुकानदार संघटनांच्या प्रतिनिधींशी आणि वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर चर्चा केली आहे. महात्मा फुले जन आरोग्य विमा योजनेतून प्रत्येक व्यक्तीला सध्या आरोग्य विमा संरक्षण आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी टोकाची भूमिका घेऊ नये. पुणे शहरातील रेशन दुकाने सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमधील काही दुकाने बंद होती. त्यांच्याशी प्रशासनाने चर्चा केली आहे, अशी माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT