Dhangekar on hospital administration Esakal
पुणे

Pune News : 'शिंदे गटाचे मंत्री ललित पाटील प्रकरणात सामील'; ससूनमध्ये राडा घालत धंगेकरांचे रुग्णालय प्रशासनावरही गंभीर आरोप

In Sassoon, Dhangekar made serious allegations against the hospital administration...

रोहित कणसे

पुण्यातील ससून रुग्णणालयातून ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर पुणे पोलीसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यादरम्यान कसबा मतदारसंघातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. धंगेकरांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्याचे पाहायला मिळाले.

रविंद्र धंगेकर यांच्याकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. धंगेगरानी ललित पाटील प्रकरणाचा जाब विचारत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र ठाकूर यांच्याकडून ससून रूग्णालयाची काहीही माहिती देण्यास नकार देण्यात आला.

यावेळी धंगेकरांनी, या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन स्वतः दोषी आहेत, त्यांची व्यवस्था दोषी आहे. ललित पाटील एका वॉर्ड मध्ये फिरतोय की हॉटेल मध्ये, कुठे चाललो आहोत आपण. या ठिकाणचे डॉक्टर खोटं बोलत आहेत. पुणे शहरात ड्रग्स माफिया आहेत, हे पोलिसांना ही माहिती आहे, तुम्ही आम्ही कमी पडतोय या गोष्टीत. ललित पाटील हा रुग्ण होता आणि तरी तो पळतोय हे सगळे शिंदे गटाचे मंत्री ललित पाटीलच्या प्रकरणात सामील आहेत, असे गंभीर आरोप धंगेकरांनी केले आहेत.

ससून रुग्णालयातील डॉक्टर वर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. ललित पाटील प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे. हिवाळी अधिवेशनात ससून रुग्णालय विषयी बाजू मांडणार असून डॉक्टरांना विनंती आणि सूचना आहे की नागरिकांचा विचार करा आणि योग्य कारवाई करा.

रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप देखील केला. तसेच धंगेकरांना रुग्णालयाचे डीन यांना अनेक प्रश्न यावेळी विचारले. नऊ महिने पेशंट रुग्णालयात कसे राहतात? रुग्ण दाखल झाल्यावर जे कागदपत्र दाखल करता ते दाखवा. तुम्ही मला गोल गोल फिरवत आहेत का? ९ महिने पेशंट राहतो कसा? असे उपचार कुठले आहेत? ९ महिने रुग्णाला पैसे घेऊन सांभाळले का? दोन वर्ष मटका किंग इथे उपचार घेतात कसे? ४ दिवस मी पत्र दिले, अद्याप उत्तर कसे दिले नाही? ललित पाटील याला पैसे घेऊन सांभाळले का? असा थेट सवाल देखील रविंद्र धंगेकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT