Kasaba Bypoll Election  
पुणे

Kasaba Bypoll Election : "बोगस मतदान करण्याचा रवींद्र धंगेकरांचा प्रयत्न"; भाजपची पोलिसात तक्रार

सकाळ डिजिटल टीम

Kasaba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीत प्रचार थांबला तरी राजकीय वार थांबले नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजप नेते एकवटले आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने धंगेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आचारसंहीतेचा भंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

भाजपने पोलिसांच्या हातून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यांनी आज भाजप विरोधात उपोषण देखील केले. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले. मात्र आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. 

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, कसब्यात बोगस मतदार आणून बोगस मतदान करण्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आज आम्ही पोलिसांना सगळे केंद्र सांगितले जिथे बोगस मतदान करण्याची तयारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. 

काल पाच वाजचा प्रचार थांबला असताना देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने उपोषणाचा बनाव केला. याच्या पाठीमागे त्यांनी प्रचार केला. त्यामुळे त्यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्याची मागणी आम्ही केली आहे. यासाठी आम्ही आयोगात तक्रार दाखल करणार आहोत, असे जगदीश मुळीक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT