jejuri
jejuri 
पुणे

गडाला नव लाख पायरी...देवा तुझी सोन्याची जेजुरी...

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : जेजुरीतील खंडोबा मंदिरावर सकाळची सूर्याची कोवळी किरणे पडल्यानंतर मंदिराचा शिखराचा भाग सध्या सोनेरी दिसत आहे. त्यामुळे सोनेरी किरणांचा जणू खंडोबाला अभिषेकच सुरू असल्याचे दृश्य दिसत असते. मंदिराचे शिखर सोन्यासारखे झाल्याचा भास होत होता. 

जेजुरीत नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे आकाश स्वच्छ व प्रदूषण विरहीत आहे. सकाळच्यावेळी सूर्यकिरणे थेट मंदिराच्या शिखरावर प्रकाशमान होताना मंदिराचे सोनेरी दृश्य दिसत आहे. जणू खंडोबाला सोनेरी सुर्यकिरणांचा अभिषेकच सुरु आहे, असा भास होत असतो.  त्यातून भाविकांच्या ओठी आपोआप, देवा तुझी सोन्याची जेजुरी...अशा ओळी येतात.

जेजुरीचे खंडोबा मंदीर सध्या दर्शनासाठी बंद आहे. नुकताच पाऊस झाल्याने मंदिराभोवतालची गुलमोहराची झाडे लाल पिवळ्या फुलांनी बहरलेली आहेत. त्यातच सोनेरी किरणांनी मंदिराचे दर्शन विलोभनीय दिसत आहे. 

मंदिराचे बांधकाम १२ व्या शतकापूर्वी
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचे खंडोबा मंदीर हे जयाद्री डोंगरात वसले आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ७९५ मीटर व जेजुरी शहरातून ५० मीटर उंचावर हे मंदीर आहे. जेजुरीत येताना कोणत्याही बाजूने पाहिले, तरी मंदीर दृष्टीस पडते. गडामधील मुख्य मंदिराच्या गाभा-याचे बांधकाम १२ व्या शतकाच्या पूर्वी झाल्याचे तेथील शिलालेखावरून समजते. मात्र, नक्की कधी झाले त्याची नोंद नाही. मंदिराभोवताच्या गडकोटाचे काम सोळाव्या शतकानंतर वेगवेगळया काळात झाल्याचे शिलालेखावरून दिसते.
 
मंदिराची रचना 
मंदिराच्या बांधकामाची काही खास वैशिष्टे आहेत. वर्षातून दोन वेळा सुर्यकिरणे थेट गाभा-यात येतात, अशी मंदिराची रचना आहे. तर, दररोज सुरवातीला शिखर, नंतर मंदिर सुर्यप्रकाशाने व्यापते. त्यांनतर गटकोटाच्या परिसरात सूर्य किरणे येतात, अशी रचना आहे. सध्या पाऊस पडून गेल्यामुळे व भाविकांची गर्दी नसल्याने मंदिर परिसरात प्रदुषण घटले आहे. वातावरण स्वच्छ असल्याने सकाळच्या सोनेरी उन्हात मंदीर सोन्यासारखे पिवळे दिसत आहे. एरवी भंडा-याने पिवळे दिसणारे मंदिर सध्या कोवळ्या उन्हात सोनेरी दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT