Income-Loss 
पुणे

पुणे महापालिका अर्थसंकल्पातील उत्पन्नात यंदा किती होणार घसरण वाचा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या साडेसहा हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातील ‘हवा’ गेल्याचे प्रत्यक्ष उत्पन्नाची आकडेवारीच सांगत आहे. चालू आर्थिक वर्षात दोन ते सव्वादोन हजार कोटींनी उत्पन्न घसरण्याची भीती असून, त्याचा परिणाम म्हणजे, एवढ्याच रकमेची विकासकामे खोळंबणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत उत्पन्नाचा आकडा ३ हजार कोटी इतकाच दिसत आहे.

महापालिकेचे सलग तीन वर्षे उत्पन्न घटत असल्याच्या धास्तीने पुढच्या तीन महिन्यांत महसूल वाढविण्याचे फर्मान स्थायी समितीने खातेप्रमुखांना सोडले. तेव्हाच एक नवा पैसाही करवाढ न करताना उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून उत्पन्न वाढविण्याचा ‘शब्द’ सत्ताधाऱ्यांनी मंगळवारी (ता. २४) पुन्हा दिला. मात्र, उत्पन्न घसरण्याची नेमकी कारणे सत्ताधारी, विरोधक आणि अधिकाऱ्यांनाही सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेत सत्तेत आल्यापासून भाजपने तीन अर्थसंकल्प मांडले. त्यात सव्वापाच ते पावणेसात हजार कोटींच्या अर्थसंकल्पांचा समावेश आहे. त्यात गाजावाजा करून जाहीर केलेल्या पहिल्याच (२०१७-१८) अर्थसंकल्पानंतर दीड हजार कोटींची घट दिसून आली.

त्यानंतर (२०१८-१९) मध्ये १ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न कमी झाल्याने विकासकामे करताना सत्ताधाऱ्यांना हात आखडता घ्यावा लागला. या अनुभवानंतर जागे होऊन सत्ताधारी आणि प्रशासन गंभीर होऊन प्रत्यक्ष उत्पन्नवाढीचे प्रयत्न करेल, अशी आशा होती. तशी पावले न उचलल्यानेच चालू आर्थिक वर्षातही जवळपास सव्वादोन हजार कोटींची तूट येण्याचा अंदाज स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने व्यक्त केला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘उत्पन्न घटत असल्याने नेमका आकडा गाठता येत नाही. त्यामागची कारणे शोधत आहोत. त्यावर लगेचच उपायही होतील. येत्या मार्चअखेरपर्यंत साडेचार हजार कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT