Court 
पुणे

पुण्यातील वकिलांनी काय केली मागणी वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे - उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात स्थापन करण्याचा ठराव होऊन ४२ वर्षे होत आली, तरी त्यावर अद्याप काही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे हजारो पक्षकार आणि वकील न्यायालयीन कामकाजासाठी दररोज मुंबईत चकरा मारत आहेत. त्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी पुण्यात तूर्तास उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ सुरू व्हावे, अशी भूमिका येथील लोकप्रतिनिधी आणि वकिलांनी घेतली आहे. 

खंडपीठाच्या मागणीसाठी येथील वकील अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र, अद्याप त्यांना यश आलेले नाही. पण, पुण्यातून उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे फिरते खंडपीठ त्यावर तात्पुरता दिलासा ठरणार आहे. 

याबाबत आमदार अनंत गाडगीळ म्हणाले, ‘‘पुण्यातील खंडपीठाबाबत तीन जणांची समिती नेमू व त्यांच्या अहवालानंतर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पुण्याला खंडपीठ द्यावे, ही माझी पहिल्यापासूनची भूमिका असून, सातत्याने पाठपुरावा केला आहे. लगेच खंडपीठ देणे शक्‍य नसेल, तर तूर्तास फिरते खंडपीठ द्यावे. महिन्यातील आठ दिवस किंवा वर्षातून दोन महिने खंडपीठ पुण्यात आले, तरी त्याचा मोठा फायदा होईल.’’

कोल्हापूरच्या भूमिकेबाबत गाडगीळ म्हणाले, ‘‘कोल्हापूर आणि परिसरातील वकिलांचा पुण्यातील खंडपीठास विरोध आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्याला जाण्यास आम्हाला जास्त वेळ लागतो, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे अंतर महत्त्वाचे की दावे लवकर निकाली लागणे, याचा विचार व्हावा. राजस्थानमध्ये चुकीच्या ठिकाणी खंडपीठ देण्यात आले होते. तेथील कामकाजच संपल्याने खंडपीठाचा गाशा गुंडाळण्यात आला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi Update Live: TMC अध्यक्षा ममता बॅनर्जी अपोलो रुग्णालयात दाखल झाल्या

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

SCROLL FOR NEXT