Sakal Publication  sakal
पुणे

Sakal Publication : ‘सकाळ प्रकाशन’तर्फे भव्य वाचक महोत्सव ; वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उपक्रम, सवलतीच्या दरांत पुस्तके उपलब्ध

वाचन संस्कृती जोपासणे ती वृद्धिंगत करणे, यासाठी सकाळ प्रकाशन कसोशीने प्रयत्न करत असते. ‘जगणं समृद्ध करणारी पुस्तक परंपरा’ हे घोष वाक्य न ठरता, ती ‘बांधिलकी’ मानत ‘सकाळ प्रकाशना’ने प्रकाशन विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाचन संस्कृती जोपासणे ती वृद्धिंगत करणे, यासाठी सकाळ प्रकाशन कसोशीने प्रयत्न करत असते. ‘जगणं समृद्ध करणारी पुस्तक परंपरा’ हे घोष वाक्य न ठरता, ती ‘बांधिलकी’ मानत ‘सकाळ प्रकाशना’ने प्रकाशन विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. याचाच एक भाग म्हणून गेली १३ वर्षे वाचक महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात सर्व विक्रेत्यांकडे सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्या-त्या वर्षी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांवर परिसंवाद, चर्चासत्रे असे अनेक कार्यक्रम होतात. सर्व विषयांची पुस्तके एकत्र एकाच छताखाली मिळण्याची संधी यामुळे वाचकांना मिळते. यंदाच्या वाचक महोत्सवालाही वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘सकाळ प्रकाशन’ने प्रकाशित केलेली ‘गोष्ट पैशापाण्याची’, ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’, ‘राजमाता जिजाऊ,’ ‘गर्भसंस्कार’ ही पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत. ‘गोष्ट पैशापाण्याची’ पुस्तकाने एक लाखाहून अधिक खपाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. डॉ. श्रीगुरू बालाजी तांबे, श्री एम, सरश्री, सदगुरू, डॉ. सदानंद मोरे, उत्तम कांबळे, डॉ. जयंत नारळीकर, श्रीराम पवार आणि डॉ. प्रकाश पवार, प्रफुल्ल वानखेडे यांच्यासह जयराज साळगावकर, विष्णू मनोहर, श्रुती पानसे, विनायक कुलकर्णी, डॉ. अविनाश भोंडवे, मंगला गोडबोले, संदीप काळे, शैलेंद्र देवळाणकर, शेखर गायकवाड या लेखकांची जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी ९५० हून अधिक दर्जेदार पुस्तके ‘सकाळ प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके घरातील सर्वांसाठी, मित्रपरिवार, सहकारी वा कर्मचारी यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

बांधकाम क्षेत्रासाठी उपयुक्त पुस्तके

स्थापत्य अभियांत्रिकी ही जगातील सर्वांत जुनी ज्ञानशाखा असून यातील नवनवीन तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य, काँक्रिट, अत्याधुनिक यंत्रप्रणाली अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेले स्थापत्य अभियंता प्रकाश मेढेकर यांचे ‘दिशा बांधकाम नवनिर्मितीची’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशन’ने २०१७ मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी अथवा पदविका प्राप्त अभियंते, वास्तुरचनाकार, संरचनाकार, कंत्राटदार, सुपरवायझर, बिल्डर, डेव्हलपर्स यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे.

पुस्तकांचे स्वागत

कॉलेजमधील अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष अनुभव यामधील पोकळी भरून काढण्याचे काम या माध्यमातून घडले आहे. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाची भाषा ओळखून आणि लोकाग्रहास्तव मेढेकर यांनी पुस्तकाचा ‘की फॉर प्रक्टिकल कन्स्ट्रक्शन’ हा इंग्रजी अनुवाद केला. त्यामुळे हे पुस्तक देश-विदेशातील पुस्तकप्रेमींपर्यंत पोचले आहे. जगातील स्थापत्य कलेचा अचंबित करणारा अनुभव, त्यामागे दडलेला मानवी विचार, कल्पना, परिश्रम यांची अनुभूती देणारे ‘बांधकाम क्षेत्राची गरुडझेप’ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. साध्या व सोप्या लेखनामुळे या तीनही पुस्तकांचे सर्वसामान्य वाचकांनीही स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: आली रे आली राधा मुंबईकर आली! सबसे कातिल राधा पाटीलची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT