Putakwale Startup Sakal
पुणे

वाचकांची हौस भागविणारे ‘पुस्तकवाले’

विविध प्रकारच्या वस्तू घरी पोहचविण्याचे अनेक स्टार्टअप कोरोना काळात सुरू झाले. त्यापैकीच एक म्हणजे ‘पुस्तकवाले’. हे स्टार्टअप सोसायटीत विविध प्रकारचे पुस्तके पोहचवते.

सनील गाडेकर

विविध प्रकारच्या वस्तू घरी पोहचविण्याचे अनेक स्टार्टअप कोरोना काळात सुरू झाले. त्यापैकीच एक म्हणजे ‘पुस्तकवाले’. हे स्टार्टअप सोसायटीत विविध प्रकारचे पुस्तके पोहचवते.

पुणे - मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या पहिल्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) जीवनावश्‍यक बाबी मिळत होत्या. मात्र, साहित्य संपदेपासून सर्वच लांब होते. अनलॉकमध्ये दुकाने सुरू झाली, तरीही तेथे जाऊन पुस्तक (Book) घेणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. वाचक आणि पुस्तकांमधील ही दरी भरून काढण्यासाठी एक संकल्पना राबवली. त्यानंतर काही दिवसांतच या उपक्रमाचे ‘पुस्तकवाले’ स्टार्टअपमध्ये (Pustakwale Startup) रूपांतर झाले. त्यातून गेल्या दीड वर्षांत ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती आशय वाळंबे यांनी दिली.

विविध प्रकारच्या वस्तू घरी पोहचविण्याचे अनेक स्टार्टअप कोरोना काळात सुरू झाले. त्यापैकीच एक म्हणजे ‘पुस्तकवाले’. हे स्टार्टअप सोसायटीत विविध प्रकारचे पुस्तके पोहचवते. त्यासाठी सोसायटीची परवानगी घेऊन पुस्तकाचे छोटेखानी प्रदर्शन भरवते व त्यातून वाचक त्यांच्या आवडीची पुस्तके घरी नेतात. १ ऑगस्ट २०२० रोजी सुरू झालेल्या या स्टार्टअपने आतापर्यंत १५ हजार पुस्तकांची विक्री केली. हे स्टार्टअप पुण्यातील ४०० हून अधिक सोसायट्यांमध्ये पोचले आहे. ग्राफिक डिझायनर असलेल्या ऋतिका वाळंबे, आशय ्याच्याबरोबर सध्या ५० तरुणांची टिम काम करीत आहे.

स्टार्टअपची व्याप्ती

  • ४०० सोसायट्यांमध्ये प्रदर्शन

  • १० हजार कुटुंबीयांनी विकत घेतली पुस्तके

  • आतापर्यंत १५ हजार पुस्तकांची विक्री

  • स्थापनेपासून ५० लाखांची उलाढाल

प्रत्येकाला सहजासहजी पुस्तक मिळावे म्हणून हा उपक्रम सुरू केला. सध्या ऑॅनलाइन पुस्तके उपलब्ध होत आहेत. मात्र, पुस्तक वाचणे प्रत्येकासाठी सोयीचे नाही. त्यामुळे आजही अनेकांचे प्राधान्य प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यास आहे.

- आशय, ऋतिका वाळंबे, पुस्तकवाले स्टार्टअप

कसे काम करतो स्टार्टअप?

  • बुक स्टोअर ऑन व्हील संकल्पना

  • परवानगी घेऊन हाउसिंग सोसायटीमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन भरवते

  • वर्षांतून किती वेळी प्रदर्शन भरवायचे याचा करार केला जातो

  • नवीन व पायरसी नसलेली पुस्तके प्रदर्शनात ठेवली जातात

  • वाचकांपर्यंत पोहण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप

  • पुढील वेळे प्रदर्शन कधी व कुठे भेटायचे याचे नियोजन केले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT