Sakal Vastu Sakal
पुणे

साकार करा, घर अन् वाहनाचे स्वप्न

दोन वर्षांच्या प्रदीर्घ लॉकडाउनमध्ये तुमचे बारगळलेल्या नवीन घराचे अथवा वाहनाचे स्वप्न आता साकार होऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दोन वर्षांच्या प्रदीर्घ लॉकडाउनमध्ये तुमचे बारगळलेल्या नवीन घराचे अथवा वाहनाचे स्वप्न आता साकार होऊ शकते. ‘सकाळ’ आणि ‘बॅंक ऑफ महाराष्ट्रा’च्या वतीने घर, वाहन आणि शिक्षणासाठी अर्थ पुरवठ्याचे असंख्य पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. येत्या शनिवारी (ता. ११) आणि रविवारी (ता. १२) ‘रियल इस्टेट, रिटेल्स ॲण्ड एमएसएमई एक्स्पो २०२१’चे आयोजन केले आहे.

एक्स्पोत २५ हून अधिक बिल्डरांचे तब्बल १२५ हून अधिक प्रकल्पांतील विविध घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने सुलभ कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील नामांकित वाहन विक्रेत्यांशी प्रत्यक्ष संवाद आणि सल्ला या एक्स्पोतून मिळणार आहे. विशेष म्हणजे गृहकर्जाबरोबरच मध्यम, लघु व सुक्ष्म उद्योगासाठीचा कर्जपुरवठ्याच्या योजनाही या दोन दिवसीय एक्स्पोत उपलब्ध असणार आहे. बॅंकेतर्फे कोणतीही प्रक्रिया शुल्क नसलेली महा स्वागत स्कीम लॉँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये व्याजाचा दर हा ६.९० टक्क्यांपासून सुरू होतो. नागरिकांनी कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करत एक्स्पोत सहभागी व्हावे.

कुठे जाल?

  • ठिकाण - महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, राजाराम पुलाजवळ

  • वेळ - सकाळी ११ ते रात्री ८

महाबॅंकेच्या योजना -

  • महाबॅंक जीएसटी क्रेडिट स्कीम

  • महाबॅंक एमएसएमई प्रोजेक्ट लोन, कॅश क्रेडिट, हॉस्पिटॅलिटी फायनान्स स्कीम

  • डॉक्टर, सनदी लेखापाल, अभियंता, कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्टसाठीची विशेष स्कीम

वैशिष्ट्ये -

गृहकर्जे

  • विविध घरांसंह प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध

  • ६.८० टक्क्यांपासून व्याजाचा दर

  • शून्य प्रक्रियाशुल्कासह महिला आणि सैन्यातील व्यक्तींसाठी विशेष सवलती

  • मालमत्तेच्या ९० टक्के मूल्याचे पतपुरवठा

वाहन कर्ज -

  • चारचाकी वाहनांपासून दुचाकी आणि इलेक्ट्रीक वाहनाचे पर्याय उपलब्ध

  • ७.०५ टक्क्यांपासून व्याजाचा दर

  • कर्जाच्या रकमेला मर्यादा नाही

  • कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट होल्डर, एमएसएमई, स्वयंरोजगार आणि कर्जदारांना ०.२५ टक्के सूट

जिल्हाभरातील ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गृहकर्जापासून ते एमएसएमई क्षेत्राला आम्ही एकाच छताखाली कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ग्राहकाला एकाच ठिकाणी असंख्य प्रकल्पांतून आपल्या आवडीचे घर साकार करण्याची संधी या एक्स्पोतून मिळत आहे.

- राजेश सिंग, विभागीय व्यवस्थापक, पुणे शहर, महाबॅंक

बॅंक ऑफ महाराष्ट्र स्वतः ग्राहकांपर्यंत पोहचत असून, सर्वच प्रकारचे सुलभ कर्जाच्या सुविधा एक्स्पोत उपलब्ध केल्या आहेत. अतिशय माफक व्याजदरात उपलब्ध केलेल्या गृहकर्जाचे, तर दोन हप्ते बॅंक स्वतः भरणार आहे.

- विवेक धवन, विभागीय व्यवस्थापक, पुणे पूर्व, महाबॅंक

कोरोनाच्या दीर्घ लॉकडाउननंतर ग्राहकांसह नवउद्योजकांसाठी एक्स्पोच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. सरकारच्या विविध योजनांसह गृह, वाहन, शिक्षण आणि लघु उद्योगांसाठी आकर्षक व्याजदरात कर्जे उपलब्ध करत आहोत.

- जतिन देसाई, विभागीय व्यवस्थापक, पुणे पश्चिम, महाबॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT