Pimpri-Chinchwad-Fire-Brigade 
पुणे

पिंपरीत अग्निशमन दलाला 'रेड अलर्ट'; जवानांच्या कामाचे तास वाढविण्याचा विचार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संसर्ग आणि 'लॉकडाऊन' च्या परिस्थिती मुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच आवश्यकता भासल्यास पोलीस अथवा वैद्यकीय सेवेतील कर्मचारी वर्गाला मदत करण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक दक्षता घेतली जात आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन खासगी रुग्णालयात देखील रुग्णांसाठी जादा खाटांची तजवीज केली जात आहे. या स्थितीत पालिकेने अग्निशमन दलाला रेड अलर्ट दिला आहे. 

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दलाकडे सध्या २३ अग्निशमन बंब आहेत. त्यापैकी, मुख्य केंद्रासह भोसरी,रहाटणी, प्राधिकरण आदी उपकेंद्रांवर सध्या १८ गाड्या वापरात अाहेत. केंद्रावरील प्रत्येक जवानाला जवळपास १० तासांच्या पाळीत कर्तव्य बजावे लागत आहे. मात्र, 'रेड अलर्ट' मिळाल्याने त्यांच्या पाळीच्या तासांमध्ये फेरबदल करण्याचा दलाचा विचार केला जात आहे. त्यांच्या कामाचे तास वाढविणे किंवा त्यांना सलग ३ पाळी लागू करून मग, जवानांना १ किंवा २ दिवस विश्रांती साठी सुट्टी देण्याचे विचाराधीन आहे. 

पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनीही त्याला दुजोरा दिला. मात्र, कर्मचारी वर्गाचे कामाचे तास वाढविण्याबाबत, अजून कोणताही निर्णय झाला नसून महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'तू माझ्यासाठी सर्वात मौल्यवान...'; कतरिना कैफची पोस्ट चर्चेत, मुलगा विहानची सुद्धा दाखवली झलक

IND vs ENG: भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर; टॉसनंतर Playing XI जाहीर

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Maharashtrian Recipe: तिखट खायला आवडतं? घरीच बनवा झणझणीत,सुकी लाल मिरची चटणी!

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

SCROLL FOR NEXT