दुय्यम निबंधक कार्यालय Sakal
पुणे

अखेर… तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर

दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या जागेत असलेले दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर सोमवारी (ता.१४) झाले असून, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशानुसार सदर कार्यालयाचे स्थलांतर केले असल्याची माहिती येथील दुय्यम निबंधक अनिता कणसे यांनी सांगितली.

"येथील कार्यालयाचे स्थलांतर करू नये म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ व शिरूर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा चेतना ढमढेरे आणि काही पदाधिकारी व ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आली होती त्यानुसार येथील कार्यालयाचे स्थलांतर स्थगित करण्यात आले होते."

दरम्यान, ग्रामपंचायत इमारतीतून गुरुवर्य ऍड.बी.ई. आव्हाड संकुल वाणिज्य इमारत तळेगाव ढमढेरे शिक्षक भवन शेजारील इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच जुन्या कार्यालय परिसरातील दुकाने बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्ते निषेध नोंदवून निवेदन देण्यासाठी येथील नवीन इमारतीत स्थलांतर झालेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असता काहीसा ताणतणाव निर्माण झाला होता.

यावेळी दुय्यम निबंधक अनिता कणसे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनला लेखी पत्राद्वारे संरक्षण मागितले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलनकर्त्या आरती भुजबळ, चेतना ढमढेरे आणि काही ग्रामस्थांनी पूर्वीच्या जागेतून ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कार्यालयाचे स्थलांतर केला. यासंदर्भात नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षकव शिक्रापूर पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले. यावेळी नवीन इमारतीत काहीकाळ ताणतणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या संरक्षणामुळे कार्यालयाचे कामकाज सुरळीत चालू झाले.

"दरम्यान, स्थलांतर केलेल्या प्रशस्त नवीन इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय सुरळीत सुरू झाले असून इमारतीसमोर प्रशस्त पार्किंगची सुविधा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्प व व्हिल खुर्चीची सुविधा, पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा, नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा आदी सुविधा असून, कोणत्याही प्रकारची अडचण प्रशासनाकडून होणार नाही अशी माहिती दुय्यम निबंधक अनिता कणसे यांनी सकाळशी बोलताना दिली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT