free diesel Sakal Media
पुणे

रिलायन्सचा रुग्णवाहिकांना मोठा दिलासा, करणार मोफत डिझेलपुरवठा

बारामतीतील रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर योजना झाली कार्यान्वित.

मिलिंद संगई, बारामती

बारामती : रिलायन्सच्या वतीने देशभरात रुग्णवाहिका, ऑक्सिजन टॅंकर तसेच ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोफत डिझेल पुरवठा करण्यात येणार आहे. बारामतीतील रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर कालपासून ही योजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती रोहित सराफ यांनी दिली.

कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत रिलायन्स कंपनीने देशभरासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. बारामतीत उपविभागीय अधिकारी यांचे पत्र असलेल्या रुग्णवाहिका, ऑक्सिजन टँकर तसेच ऑक्सिजन सिलिंडर्सची वाहतूक करणा-या वाहनांना एका वेळेस कमाल 50 लिटर डिझेल पुरविले जाणार आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी समाजातील विविध घटक वेगवेगळ्या मार्गांनी मदतीचा हात पुढे करत आहे. आता रिलायन्सने थेट रुग्णवाहिका व ऑक्सिजनवाहतूक करणा-या वाहनांना कमाल 50 लिटर डिझेल मोफत देण्याचा मोठा निर्णय घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयाचा फायदा अप्रत्यक्षपणे रुग्णांनाही होईल व इंधनावरचा रुग्णवाहिकांचा खर्चही कमी होणार आहे.

कालपासून बारामतीत ही सुविधा देण्यात आली आहे. रुग्णवाहिकांमार्फत रुग्णांची ने आण केली जाते, ही बाब विचारात घेत रिलायन्सने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या वतीने जो पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे तो पर्यंत या वाहनांना मोफत डिझेल पुरवठा केला जाणार असल्याची माहिती रोहित सराफ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉकपिटमध्ये चाकू हल्ला, विमान वेगाने खाली आलं... तरी १७४ जणांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार कोण? साहस पाहून नेतान्याहू, ट्रम्पही शॉक

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

SCROLL FOR NEXT