vijay shivtare Sakal Media
पुणे

माजी मंत्री शिवतारेंचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा

पुरंदर-हवेलीमध्ये रेमडेसिवीर न दिल्यास ठिय्या मारणार

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड : पुरंदर-हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळत नसल्यामुळे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उद्या (ता. 19) सोमवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हा समक्ष भेटीचा निर्णय घेतला आहे. गरज पडल्यास तिथेच ठिय्या मारण्याचा निर्णय शिवतारे यांनी जाहीर केला आहे. याबाबत तसे पत्रक प्रसिद्धला दिले आहे. यात ते म्हणतात, पुरंदर-हवेलीत रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने हाहाकार झाला आहे. मृतांचे आकडे पोटात गोळे आणणारे झाले आहेत. त्यामुळे मी स्वतः किडनी पेशंट असूनही जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत शिवतारे पुढे म्हणाले, ही चळवळ सरकारच्या किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात नाही. जिल्ह्याला येणारी औषधे काही मातब्बर मंडळी आपल्या तालुक्यासाठी ओरबाडून नेत आहेत. त्यात पुरंदर, हवेली, भोर अशा तालुक्यांना मरणासाठी वाऱ्यावर सोडून दिले आहे. ही परिस्थिती मी आता पाहू शकत नाही. मी आजारी असलो तरी तालुक्यातील लोकांचे जीवही महत्वाचे आहेत. जिल्हाधिकारी आणि अन्न - औषध प्रशासन विभाग यांनी गैरकारभार चालवला असून वितरण समन्यायी पद्धतीने होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागाचा विचार करता पुरंदर आणि हवेली तालुका हा कोरोनाने सर्वाधिक वेढला गेलेला आहे. इथे मृत्युदर सर्वांत जास्त आहे. तरीही इथे रेमडेसिवीर मिळत नाहीत. कोविशिल्ड लस सुद्धा जिल्ह्यात सर्वात कमी पुरंदरला मिळाली आहे. इथेही माणसं राहतात याची जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी, असंही शिवतारे म्हणाले.

कोरोनाचे नियम पाळणार-दरम्यान हे करीत असताना आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळणार आहोत. मोजक्या दहा ते वीस लोकांची उपस्थिती असेल. सोशल डिस्टनसिंग आणि इतर नियम यांचे काटेकोर पालन होईल., अशी माहिती शिवतारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

SCROLL FOR NEXT