Black Magic racket busted at Holkar Bridge in Pune by ANIS  
पुणे

पुण्यात 'अनिस'ची मोठी कारवाई; काळ्या जादुच्या नावखाली झाडांना ठोकलेले खिळे, बाहुल्या हटविल्या.

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात अंधश्रद्धा हटविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीमार्फत मोठी कारवाई करण्यात आली. होळकर पुलाखाली म्हसोबा मंदिराच्या परिसरात झाडांना लावलेल्या काळ्या बाहुल्या हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. महा अनिसच्या पुणे जिल्हाच्या अध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबिवण्यात आली.  याबाबत मागील 4 वर्षांपासून अनिसमार्फत याबाबत सतत पाठपुरवा होत असून खडकी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जादुटोणा, करणी सारख्या अंधश्रध्देला बळी पाडून लोकांची फसवणूक केली जाते. ही मानसिकता बदलण्यासाठी  'जादुटोणा विरोधी कायदा' अस्तिवात येऊनही अजुनही अशा घटना घडत आहे.  झाडांना काळ्या बाहूल्या, बिब्बे, लिंबू, खिळे टोकण्यात आल्या होत्या. यामुळे झाडांची देखील मोठया प्रमाणात हानी होत असते. अनिसने केलेल्या कारवाईमुळे या झाडांना मुक्ती मिळाली आहे. या मोहिमेत महा अनिस पुणे जिल्ह्याचे कार्यकर्ते श्रीराम नलवडे, विजय सुर्वे, भगवान काळभोर, रामचंद्र कदम, राजू कदम, शुभम जाधव, स्वप्नील पंडित देखील सहभागी होती.

सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटिंग सुरू, व्हिडिओ कॉल आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसतो

''
होळकर पुलाखाली झाडांना लिंबु, काळ्या बाहुल्या , खिळ्यांच्या सहाय्याने ठोकल्या आहेत. लोकांच्या अंधश्रध्दा निर्माण करुन असे प्रकार केले जातात. लोकांची फसवणूक केली जाते. जादुटोणा विरोधी कायद्यानुसार हा प्रकार गुन्हा असूनही अद्याप असे प्रकार होत असतात. यासाठी पोलिसांनी सर्तक राहयला हवे. सिसीटिव्ही कॅमरे बसवयाला हवे. ''
- नंदिनी जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, पुणे जिल्हा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार घ्या जाणून

घटस्फोटाच्या ११ वर्षानंतर पुन्हा लग्न करायला तयार आहे तेजश्री प्रधान; अखेर मनातलं सांगितलंच, म्हणते-

US Midterm Elections: अमेरिकेतही ‘लाडकी’ योजना; मध्यावधीसाठी पाच हजार डॉलर देण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

नवी मुंबई विमानतळावरून तिकीटदर कमी होणार? लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत, प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT