jalparni alandi. 
पुणे

जलपर्णी हटविण्यासाठी पहा काय लढवली शक्कल! 

विलास काटे

आळंदी (पुणे) : येथील इंद्रायणी नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून साचून राहिलेली जलपर्णी हटविण्याचे काम आळंदी पालिकेकडून सुरू आहे. याचबरोबर जलपर्णीची पुन्हा वाढ होऊन पाणी पुरवठ्यास अडथळा होऊ नये, यासाठी इंद्रायणी पात्रात शंभरहून अधिक प्लॅस्टिकचे बॅरल टाकून जलपर्णी अडविली जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागप्रमुख दत्तात्रेय सोनटक्के यांनी दिली. 

आळंदीतील सिद्धबेट येथील पाणी पुरवठा करणाऱ्या इंद्रायणीतील बंधाऱ्यात बेसुमार जलपर्णी साठली होती. त्यामुळे पाण्यातील माशांबरोबरच इतर जलचरांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. याशिवाय पाण्यास वास आणि हिरवट पिवळा रंग येत होता. आळंदीत आधीच पाणी पुरवठ्याची बोंब असताना पाण्याला वास येत असल्याने नागरिकांची नाराजी होती. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली महिनाभर पालिकेचे कर्मचारी कामात अडकले होते. त्यामुळे जलपर्णीकडे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान, आता पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ठेकेदार आणि पंधरा कर्मचारी लावून जलपर्णी काढली जात आहे. एकीकडे जलपर्णी काढण्याचे काम चालू आहे. तसेच, दुसरीकडे जलपर्णीची पुन्हा वाढ होऊ नये, यासाठी क्रेनच्या साहाय्याने नदीपात्रात प्लॅस्टिकचे बॅरल टाकून जलपर्णी अडविली जात आहे. 

आळंदी पालिकेने जलपर्णी काढली, मात्र पात्राबाहेर फेकून देण्याऐवजी पुन्हा ती बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस नदीपात्रातच फेकून दिली जात आहे. त्यामुळे जलपर्णीचे समूळ उच्चाटन होण्याऐवजी पुन्हा पाण्यातच फेकली जात असून, आळंदीच्या पुढील धानोरे, चऱ्होली, सोळू, गोलेगाव, मरकळ या गावांना जलपर्णीचा उपद्रव होत आहे. या गावातील नदीपात्रात जलपर्णी वाढल्याने मच्छरांचा उपद्रव होत आहे. 

लॉकडाउन काळातही पिंपरी चिंचवड हद्दीतून सांडपाणी सोडले गेल्याने नदीपात्रातील पाण्याचा काळपट रंग काही बदलला नाही. तसेच, बंधाऱ्यातील पाण्याचा साठाही पिंपरी चिंचवडकरांच्या सांडपाण्यामुळे आटला नाही. आजही बंधाऱ्यातून पाणी पुढे जात आहे. कुदळवाडी, चिखली भागातून लघू उद्योजक कारखाने बंद असल्याने फक्त रसायनयुक्त सांडपाणी कमी झाले एवढाच फरक सध्या इंद्रायणीच्या पाण्यात पडला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत लघुउद्योग सुरू झाल्यावर पुन्हा इंद्रायणीच्या प्रदूषणात भर पडणार असल्याचे चित्र आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT